सोनं होतंय स्वस्त की महाग ‘या’ 5 स्मार्ट पद्धतींनी करा गुंतवणूक, भविष्यासाठी कमवा भरघोस नफा
गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंमध्ये चांगलाच (money)चढउतार पाहायला मिळतोय. मात्र गेले सहा महिने किंवा वर्षभराचा विचार केल्यास तुम्हाला सोन्याच्या भावात एकंदरीत वाढ झाल्याचंच दिसेल. त्यामुळेच सोनं हा असा धातू आहे, ज्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला भविष्यात हमखास चांगले पैसे मिळू शकतात, असा दावा केला जातो. मात्र सोन्याच्या दरातील सध्याचा चढउतार पाहून अनेकांना यात गुंतवणूक करावी की नाही, असा प्रश्न पडेल. मात्र तुम्ही सोन्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात चांगले रिटर्न्स मिळवू शकाल.
सोन्यात गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे पर्याय कोणत आहेत?
सोन्यात गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. तुम्हाला एकूण पाच पद्धतीने सोनं खरेदी करता येतं. यातील सर्वश्रूत असलेला पर्याय म्हणजे थेट सोन्याचा धातू खरेदी करणे. काहीजण सोन्याचं बिस्किट, नाणे, दागिने अशा वेगवेगळ्या मार्गाने सोन्यात गुंतवणूक करतात. मात्र तुम्ही गोल्ड इटीएफच्या माध्यमातूनही सोन्यात गुंतवणूक करू शकता.
सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्येही करता येते गुंतवणूक
म्युच्यूअल फंडामध्येही सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. सध्या अनेक गोल्ड म्युच्यूअल फंड्स अपलब्ध आहेत. त्यात तुम्ही तुमच्या सोईनुसार गुंतवणूक करू (money)शकता. केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात येणाऱ्या सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता. सॉवरेन गोल्ड बॉण्डच्या माध्यमातून गुंतवलेल्या पैशावर व्याज मिळते तसेच तुम्हाला भविष्यात त्यावेळच्या सोन्याच्या दरानुसार पैसे मिळतात.
डिजिटल गोल्ड पर्यायही उपलब्ध
तुम्ही डिजिटल गोल्डच्या माध्यमातूनही सोन्यात पैसे गुंतवू शकता. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अगदी एका रुपयापासून सोन्यात गुंतवणूक करता येते. अनेक फिनटेक प्लॅटफॉर्म्स तुम्हाला तशी सोय उपलब्ध करून देतात. तुम्हाला तुम्ही केलेली गुंतवणूक त्यावेळच्या सोन्याच्या भावानुसार विकूही शकता. विशेष म्हणजे डिजिटल गोल्डच्या माध्यमातून तुम्ही गुंतवलेल्या पैशांतून तुम्ही फिजिकल सोनंदेखील खरेदी करू शकता.
आधी योग्य अभ्यास करणे गरजेचे
हेही वाचा :
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी
आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा