जेईई मेन परीक्षा ४ एप्रिलपासून

पुणे : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी तर्फे घेण्यात येणारी दुसऱ्या सत्रातील जेईई मेन (jee main)परीक्षा येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे. देश आणि विदेशातील ३१९ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे.

देशातील विविध शिक्षण संस्थांमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई मेन ही परीक्षा ‘एनटीए’मार्फत घेण्यात येते. दरवर्षी जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांत ही परीक्षा घेतली जाते. बी.ई. आणि बी.टेक. अभ्यासक्रमासाठी ४, ५, ६, ८, ९ एप्रिलला ही परीक्षा होणार आहे. या कालावधीत होणारी ही परीक्षा सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशा दोन सत्रांत होणार आहे, तर बी.आर्च, बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी १२ एप्रिल रोजी ही परीक्षा सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा या कालावधीत घेतली जाईल

या परीक्षेसाठी (jee main)परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असणार आहे, हे विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच दिले जाणार आहे, असे ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ‘www.nta.ac.in’ आणि या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहनही ‘एनटीए’ने केले आहे.

हेही वाचा:

ही’ आहेत सांगलीची उन्हाळ्यातली शीतपेये; काय आहे खासियत?

अजितदादांच्या कोट्यातून उमेदवारी अर्ज, महादेव जानकरांचं शक्तिप्रदर्शन

हार्दिकने मुंबईच्या कॅप्टन्सीपेक्षा या एकाच गोष्टीचा विचार करावा