महाराष्ट्राच्या विद्युत विभागामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. (Electricity )या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. रोजगार हवा असल्यास या भरतीसाठी नक्कीच अर्ज करा. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड ने २४९ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त करण्यात येणाऱ्या उमेदवारांना इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि COPA सारख्या विभागांमध्ये काम करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार mahadiscom.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र मेट्रोत १५१ पदांसाठी भरती, अडीच लाखांहून अधिक पगार; आजच करा अर्ज
इलेक्ट्रिशियन पदासाठी ११० रिक्त जागा रिकाम्या आहेत. वायरमन पदासाठी १०९ जागा तर COPA पदासाठी एकूण ३० जागा रिकाम्या आहेत. उमेदवारांना या भरतीसाठी काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत. (Electricity )कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून येणाऱ्या उमेदवारांकडे जर संबंधित क्षेत्रात ITI प्रमाणपत्र असेल तर ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात तर जास्तीत जास्त २७ वर्षे आयु असणारे उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येईल.
या भरतीत उमेदवारांची निवड केवळ मेरिटच्या आधारे केली जाणार आहे. म्हणजेच कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही, तर उमेदवारांच्या शैक्षणिक गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल. दस्तावेज तपासणीची तारीख 21 ते 23 जून 2025 दरम्यान ठेवण्यात आली आहे. (Electricity )त्यामुळे उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवणे गरजेचे आहे.
यामध्ये ITI प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, जात प्रमाणपत्र लागू असल्यास आणि निवास प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी mahadiscom.in या अधिकृत वेबसाइटला भेट देणे योग्य ठरेल.अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम mahadiscom.in या वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर होमपेजवरील ‘Career’ किंवा ‘Apprenticeship’ या विभागात जावे. त्यामध्ये संबंधित भरतीची लिंक शोधून त्यावर क्लिक करावे आणि संपूर्ण अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. शेवटी अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंटआउट काढून ठेवावा.
हेही वाचा :