फक्त 6 धावा अन् धोनी करणार मोठा विक्रम

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात एमएस धोनीला चेन्नई सुपर किंग्ससाठी मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 18 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. (cricket)राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.यंदाच्या आयपीएलच्या 17 व्या हंगामात धोनीला पहिल्या दोन सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.

पण तिसऱ्या सामन्यात त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत 16 चेंडूत 37 धावांची नाबाद खेळी केली होती.आता जर धोनीला हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीची (cricket)संधी मिळाली आणि जर त्याने 6 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या, तर तो चेन्नई सुपर किंग्ससाठी 5000 धावा पूर्ण करेल.जर असे झाले,

तर धोनी सुरेश रैनानंतर चेन्नई सुपर किंग्ससाठी टी20 मध्ये 5000 धावा पूर्ण करणारा दुसराच फलंदाज ठरेल.रैनाने टी20 क्रिकेटमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी 200 सामन्यांत 5529 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 शतकांचा आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच सध्या एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्ससाठी 247 टी20 सामन्यांत 4994 धावा केल्या आहेत. यामध्ये 23 अर्धशतकांचा समावेश आहे.

चेन्नई सुपर किंग्ससाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटर

  • 5529 – सुरेश रैना (200 सामने)
  • 4994 – एमएस धोनी (247 सामने)
  • 2932 – फाफ डू प्लेसिस (100 सामने)
  • 2213 – माईक हसी (64 सामने)
  • 2205 – मुरली विजय (89 सामने)

दरम्यान चेन्नई सुपर किंग्सच्या 17 व्या आयपीएल (cricket)हंगामातील कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर पहिल्या दोन सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. तिसऱ्या सामन्यात चेन्नईला दिल्लीविरुद्ध पराभवाचा धक्का बसला.आता यानंतर हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून पुन्हा विजयी मार्गावर येण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल.यंदा चेन्नई संघ ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. धोनीने या हंगामापूर्वी चेन्नईचे कर्णधारपद सोडले आणि नेतृत्वाची धुरा ऋतुराजकडे सोपवली आहे.

हेही वाचा :

संजय मंडलिक-संभाजीराजे एकमेकांसमोर, सर्वांच्या नजरा थांबल्या, पुढे जे झालं ते महाराष्ट्रानं पाहिलं

कोल्हापूर : भर रंकाळा चौपाटीवर नागरिकांच्या डोळ्यासमोर सशस्त्र तरुणावर हल्ला करण्यात आला

हातकणंगले मतदारसंघात चर्चेला उधाण…..