इचलकरंजी : कबनूर उरुसानिमित्य उद्या कुस्त्यांचे जंगी मैदान!

कबनूर येथील ग्रामदैवत जंदिसाहेब व ब्रॉनसाहेब ऊरुसानिमित्त उद्या शुक्रवार ता. ५ एप्रिल रोजी दुपारी ४.०० वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन पैलवान रोहित लाडपूर यांच्यामध्ये आहे. (battleground)द्वितीय क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध हरियाणाचा पैलवान सोनू कुमार भवानी यांच्यामध्ये होणार आहे.

तृतीय क्रमांकाची कुस्ती शिवराम दादा कुस्ती संकुलाचा पैलवान शुभम सिद्धनाळे विरुद्ध भोसले व्यायाम शाळेचा पैलवान प्रशांत शिंदे यामध्ये होणार आहे चतुर्थ क्रमांकाची कुस्ती व्यंकोबा मैदानाचा पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध हांडे पाटील तालीम मंडळचा पैलवान सुरेश ठाकूर यांच्यामध्ये होणार आहे. (battleground)पाचव्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी पैलवान प्रकाश इंगळगी विरुद्ध गंगावेश तालीमचा पैलवान कमलजीत पंजाब यांच्यामध्ये होणार आहे.

विशेष आकर्षण म्हणून नेपाळचा पैलवान देवा थापा याची कुस्ती होणार आहे.प्रथम क्रमांकाच्या कुस्तीतील विजेत्यास स्वर्गीय पैलवान देवगोंडा बाळगोंडा पाटील (वस्ताद) यांच्या स्मरणार्थ पैलवान अशोक देवगोंडा पाटील यांच्याकडून चांदीची गदा बक्षीस दिली जाणार आहे. या कुस्ती मैदानात महिलांच्या कुस्ती होणार असून प्रथम क्रमांकाची कुस्ती शहापूरची पैलवान आर्या नवनाळे विरुद्ध हातकणंगलेची पैलवान ईश्वरी गडकरी यांच्यामध्ये आहे. द्वितीय क्रमांकाची कुस्ती पै. ऋतुजा बिले विरुद्ध कर्नाटकची (battleground)पै. निकिता मुरगुडी यांच्यामध्ये आहे. तृतीय क्रमांकाची कुस्ती पै. जागृती पाटील विरुद्ध पै. प्रतिमा कांबळे यांच्यामध्ये होणार आहे

हेही वाचा :

सांगली लोकसभेवरून मविआत तिढा? ठाकरे गट चंद्रहार पाटलांची उमेदवारी मागे घेणार? संजय राऊत म्हणाले…

15 एप्रिलपासून कॉल फॉरवर्डिंग होणार बंद? 

चिप्सच्या पुड्यांनी सजवली नवरदेवाची गाडी : Viral Video