Kolhapur: नको तिथे हात अन् अश्लील शब्दांचा वापर, नराधम शिक्षकाचं मुलींसोबत गैरवर्तन;कोल्हापुरकरांनी दाखवला इंगा

विद्यार्थी शिक्षक नात्याला काळिमा फासणारी घटना कोल्हापुरातून उघडकीस आली आहे.(necessary)नराधम शिक्षक मुलींचे लैंगिक शोषण करीत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पालकांनी शिक्षकाला शाळेच्या आवारात चोप दिला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी हस्तक्षेप घेत त्याला ताब्यात घेतलं. या संतापजनक कृत्यानंतर कापशीतून निषेध फेरी काढून कापशी बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.नुसार मुल्ला ५५ असे शिक्षकाचे नाव आहे. सेनापती कापशी येथील न्या.रानडे विद्यालयात मुल्ला सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुल्ला मुलींच्या अंगाला हात लावायचा आणि संवाद साधताना अश्लील शब्द वापरायचा. याची माहिती मुलींकडून पालकांना मिळताच त्यांनी शाळा गाठत शिक्षकाला बेदम मारहाण केली.

गेल्या काही वर्षांपूर्वी मुल्ला मुरगुड शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. मात्र, तिथेही मुलीशी अश्लील वर्तन सुरूच होते.(necessary)त्यावेळीही पालकांना समजताच त्यांनी आरोपी शिक्षकाला बेदम चोप दिला. त्यानंतर त्याची बदली कापशी रानडे हायस्कूलमध्ये करण्यात आली. मात्र, येथेही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.दरम्यान, कापशी रानडे हायस्कूलमधून हा प्रकार समोर आल्यानंतर पालकांना राग अनावर झाला. त्यांनी आवारातच मुल्लाला चोप दिला. घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतलं. दरम्यान, पोलीस शिक्षकाला घेऊन जात असताना पालकांनी त्यांची गाडी अडवली. तसेच लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. या घटनेची नोंद मुरगुड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेचा निषेध म्हणून संपूर्ण कापशी गावात बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून निसार मुल्ला यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (necessary)शाळा व्यवस्थापनाने देखील अधिकृत पत्रक काढून मुल्ला यांची तात्काळ बडतर्फी केल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा :