जान्हवी कपूरला आवडतो उर्फी जावेदचा फॅशन सेन्स…

सोशल मीडियावर नेहमीच उर्फी जावेद तिच्या फॅशनमुळे(fashion) चर्चेत असते. उर्फीला तिच्या अभिनयानं जितकी लोकप्रियता मिळाली नाही तितकी लोकप्रियता तिला तिच्या फॅशनमुळे मिळाली. उर्फीनं फॅशनमध्ये अनेक सेलिब्रिटीजला मागे टाकलं असं नेटकरी बोलताना दिसतात. एकीकडे जिथे उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांमुळे ट्रोल होते तर दुसरीकडे सेलिब्रिटी तिच्या फॅशनची स्तुती करताना दिसतात.

काही दिवसांपूर्वी समांथानं उर्फीच्या एका ड्रेसचा फोटो शेअर करत तिच्या फॅशन(fashion) सेन्सची स्तुती केली होती. तर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्रीला उर्फीच्या फॅशनची भुरळ लागली आहे. इतकंच नाही तर तिनं उर्फीच्या फॅशननं ती इन्स्प्यार होत असल्याचं सांगितलं. ती अभिनेत्री दुसरीकोणी नसून जान्हवी कपूर आहे.

जान्हवी सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मिस्टर एंड मिसेज माही’ मुळे चर्चेत आहे. सध्या ती याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. क्रिकेटवर आधारीत असलेल्या या चित्रपटाचं प्रमोशन करत असताना जान्हवीनं तिच्या चाहत्यांशी संपर्क साधला. जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘आस्क मी एनीथिंग’ सेशल ठेवलं होतं.

या दरम्यान, जान्हवीनं चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिलं. त्यावेळी जान्हवीला विचारण्यात आलं की ती कोणाला फॅशन आयकन मानते. त्यावर उत्तर देत जान्हवी म्हणाली की अमेरिकेची अभिनेत्री जेंडेया आणि सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेदचा ड्रेसिंग सेन्स तिला फार आवडतो.

या सेशन दरम्यान जेव्हा जान्हवीला विचारण्यात आलं की ती अभिनेत्री जेंडेयाला कॉपी करते? त्याचं उत्तर देत जान्हवी म्हणाली की ‘हो, मला ती खूप आवडते. मला असं वाटतं की तिनं ‘चैलेंजर्स’ आणि ‘ड्यून : पार्ट टू’ या तिच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी जे काही केलं त्यानं ती इंस्पायर झाली. इतकंच नाही तर फक्त जेंडेया नाहीतर उर्फी जावेद देखील तिच्या फॅशनमध्ये काही ना काही क्रिएटिव्हिटी करताना दिसते.’

दरम्यान, जान्हवी कपूरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा ‘मिस्टर आणि मिसेस माही’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 31 मे रोजी थिएटरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या चित्रपटात एका अशा नवरा-बायकोची स्टोरी दाखवण्यात आली आहे. ज्यात एक नवरा त्याच्या पत्नीला कशा प्रकारे क्रिकेटर बनवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो.

हेही वाचा :

भाजप उमेदवारानं हटवले मुस्लीम महिलांच्या चेहऱ्यारचे बुरखे

सांगलीतील उमेदवार विशाल पाटलांची बदनामी, दोघांविरोधात गुन्हा नोंद

बायकोचा दिवाना! पत्नी नांदायला आली नाही म्हणून सात ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी