मोठी बातमी! खासदार नवनीत राणांच्या घरी चोरी…

एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असतानाच मुंबईमधून(news) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती लोकसभेच्या खासदार आणि महायुतीच्या उमेदवार नवणीत राणांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्यांच्या बिहारी नोकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खासदार नवनीत राणा(news) व रवी राणा यांचे मुंबईच्या खार पश्चिम भागात घर आहे. या घरातून दोन लाखांची रोकड चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमागे त्यांचा नोकर अर्जुन मुखिया याचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने त्याच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन मुखिया हा बिहारचा रहिवाशी असून तो होळीनिमित्त गावी निघून गेला, मात्र तो अद्याप परत आला नाही. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी खार पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच बिहारला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, नवणीत राणा या लोकसभेच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश बुब यांचे आव्हान होते. अमरावती लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून चार जून रोजी निकाल समोर येणार आहे. त्यामुळे नवणीत राणा पुन्हा एकदा बाजी मारणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

सांगलीतील उमेदवार विशाल पाटलांची बदनामी, दोघांविरोधात गुन्हा नोंद

भाजप उमेदवारानं हटवले मुस्लीम महिलांच्या चेहऱ्यारचे बुरखे

बायकोचा दिवाना! पत्नी नांदायला आली नाही म्हणून सात ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी