सलमान खानसारखं प्रकरण करू…, जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकी

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर बिष्णोई गँगकडून गोळीबार(threat) केल्याची घटना ताजी असतानाच आता एका राजकीय नेत्याला बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आल्याची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लॉरेन्स बिष्णोई गँगने धमकी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांना फोन करून बिष्णोई गँगने धमकी दिली आणि २ लाख रुपयांची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही तासांपूर्वी जितेंद्र आव्हाड(threat) यांना बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आला होता. फोन करत 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर सलमान खानसारखं प्रकरण करण्याची धमकी देण्यात आली आहे. रोहित गोडारा नावाच्या व्यक्तीने हा फोन केला होता.

ऑस्ट्रेलियावरून फोन केला असल्याचे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे. या फोनमुळे एकच खळबळ उडाली आहे. बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन जरी आला असला तरी जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.

हेही वाचा :

अरविंद केजरीवाल यांना धक्का! ७५ हजारांचा ठोठावला दंड

…अन् धोनीने ड्रेसिंग रुममध्येच हेल्मेट फेकून दिलं; CSK च्या माजी खेळाडूने सांगितली ती घटना, ‘मी त्याला…’

दारुपार्टीत वाद; रागाच्या भरात व्यावसायिकाच्या मुलाला 5 स्टार हॉटेलच्या टेरेसवरून फेकलं : video