महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, अनेक सुनांना सासरकडून मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागतं. मात्र या सगळ्या नकारात्मक वातावरणात एक(suicide) सकारात्मक उदाहरण समोर आलं आहे — बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेने तिच्या सासरकडील नातेसंबंधांबाबत दिलेला अनुभव चर्चेत आला आहे.

लोकप्रिय टीव्ही मालिका ‘अनुपमा’ मधील खलनायिकेच्या भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मदालसा शर्मी ही मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीची पत्नी आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितलं की, लग्नानंतर तिच्या सासरकडून तिला अत्यंत आदराने आणि प्रेमाने स्वीकारण्यात आलं.

मदालसा म्हणाली —

“लग्नाआधीच मी माझी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण लग्नानंतर मी ज्या घरात सून म्हणून गेले, त्या घरात कुणीही माझी ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी मला माझ्या कामासह, माझ्या स्वभावासह स्वीकारलं. मला कधीच स्वतःला बदलण्याची गरज भासली नाही.”

तिने पुढे सांगितले की, मिथुन दा हे केवळ उत्तम अभिनेते नाहीत, तर उत्कृष्ट कुक देखील आहेत.

“असा कोणताच पदार्थ नाही जो त्यांना बनवता येत नाही. ते त्यांच्या स्वतःच्या खास रेसिपी तयार करतात. महिन्याचे 28 दिवस शूटिंग असलं तरी जेव्हा ते घरी असतात, तेव्हा स्वयंपाक करतात,” असे मदालसा म्हणाली.

मदालसा शर्मीने तिच्या सासरकडील नातेसंबंधांबाबत केलेला हा खुलासा समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे. ज्या काळात अनेक सून सासरी छळ, अन्याय आणि दुय्यम वागणुकीमुळे(suicide) मानसिक त्रास सहन करत आहेत, त्यावेळी मदालसाने सांगितलेली ही अनुभवकथा ‘सासर-सुनेच्या नात्यातील आदर्श नात्याचं उदाहरण’ मानली जात आहे.

अभिनेत्रीच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर, मदालसा ‘अनुपमा’ मालिकेतील तिच्या दमदार भूमिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. त्यानंतर ती ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटातही झळकली होती. ती सोशल मीडियावरही अत्यंत सक्रिय असून, तिच्या पोस्ट्स आणि व्हिडिओंवर लाखो चाहते प्रतिक्रिया देतात.

हेही वाचा :

भारताला धक्का, परदेशातील एकमेव Airbase झाला बंद

सोने, चांदी तब्बल ‘इतक्या’ हजारांनी झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर

भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र मूल्यांकन भारताला शंभर पैकी 38 गुण

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *