भारतातून ‘ईव्ही’ निर्यात करणारी ‘सिट्रॉन’ पहिली बहुराष्ट्रीय कंपनी

चेन्नई : भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारींची(multinational companies) परदेशात निर्यात करणारी ‘सिट्रॉन’ ही पहिली बहुराष्ट्रीय कंपनी ठरली आहे. फ्रेंच वाहन उत्पादक कंपनी ‘सिट्रॉन’ने भारतातील उत्पादन प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या ‘ई-सी थ्री’ या मोटारींची निर्यात सुरू केली आहे.

‘सिट्रॉन’च्या ५०० ‘ई-सी थ्री’ मोटारी इंडोनेशियाला पाठवण्यात आल्या. ‘सिट्रॉन’चे हे पाऊल देशात जगासाठी शाश्वत इलेक्ट्रिक वाहने(multinational companies) तयार करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे.

या वेळी स्टेलांटिस इंडियाचे सीईओ आणि एमडी आदित्य जयराज म्हणाले, ‘‘भारत ही केवळ स्टेलांटिस समूहासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ नाही, तर वाहने आणि मोबिलिटी तंत्रज्ञानासाठी एक प्रमुख स्रोत आहे. जागतिक स्तरावर भारताच्या उत्पादन कौशल्याचे प्रदर्शन करताना आम्ही भारताच्या वाढीसाठी आणि शाश्वत गतिशीलतेला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहोत.’’

हेही वाचा :

भाजप आमदाराला गावकऱ्यांच्या विरोध; साहेब आल्या पावली परतले

अजित पवारांना मोठा धक्का बसणार? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

‘एल क्लासिको’ मॅचआधी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! तुफान गोलंदाज सामन्यातून बाहेर