मोदी पूर्णपणे अपयशी पंतप्रधान, विकासाचे गुजरात मॉडेल म्हणजे बुडबुडे; ठाकरे गटाची बोचरी टीका

मोदी हे पूर्णपणे अपयशी पंतप्रधान आहेत. त्यांनी निर्माण केलेले विकासाचे(development) गुजरात मॉडेल म्हणजे बुडबुडे आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. कार्यवाहक पंतप्रधान मोदी हे सध्या विकास, लोककल्याण, गरिबी हटवण्यावर बोलू लागले आहेत. त्यांचे बोलणे वरवरचे आहे, पण देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

मोदी यांनी देशाची(development) सूत्रे 2014 साली हाती घेतली तेव्हा देशावर 49 लाख कोटी कर्ज होते. 2024 साली कर्जाचा आकडा 205 लाख कोटींवर जाऊन पोहोचला, पण या कर्जाच्या बदल्यात देशाला काय मिळाले? देशातील मोठा वर्ग गरिबी, बेरोजगारीशी संघर्ष करतो आहे व महागाई हटवण्याची मोदींची घोषणा फोल ठरली आहे”, असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आलाय.

“मोदी पंतप्रधान झाले तेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया 58 इतका होता, तर आता 85 इतका घसरला. ही एक प्रकारे देशाची घसरगुंडीच आहे, अशी आकडेवारी देखील सामना अग्रलेखातून मांडण्यात आली आहे. मोदी यांनी 85 कोटी गरीबांना माणसी पाच किलो फुकट रेशन देण्याचा निर्णय घेतला. गरीबांना काम न देता ऐतोबा बनवण्याचा हा प्रकार आहे”.

“लोकांना फुकट धान्य द्यायचे आणि त्या बदल्यात धान्यांच्या गोणींवर स्वतःचा फोटो छापून घ्यायचा. देशात आजही 35 कोटी बालके कुपोषित आहेत. मोदी त्यांच्या या अपयशाविषयी काहीच बोलताना दिसत नाहीत. मोदी यांना सामाजिक भान नाही”, अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे.

“मोदी यांना अर्थशास्त्र अजिबात कळत नाही. मोदी हे व्यापारी आहेत असे ते स्वतःच सांगतात, पण स्वतःचा गल्ला मोजणे वेगळे व देशाला आर्थिक दिशा देणे वेगळे. मोदी यांनी अर्थव्यवस्थेबाबत जो लहरीपणा दाखवला तो धक्कादायक आहे”, असंही सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

“मोदी काळात रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता संपुष्टात आली. नोटाबंदीसारखे निर्णय घेताना रिझर्व्ह बँकेला पूर्णपणे अंधारात ठेवले गेले. मोदी यांनी मूठभर उद्योगपतींची 16 लाख कोटींची बँक थकबाकी एका झटक्यात माफ केली. हा निर्णय अर्थव्यवस्थेला दुबळे करणारा होता. 16 लाख कोटी हा आकडा लहान नाही, पण मोदींनी हे उद्योगपतींचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ते बोलायला तयार नाहीत”, असा घणाघातही सामना अग्रलेखातून भाजपवर करण्यात आलाय.

हेही वाचा :

‘हा’ पांढरा पदार्थ हार्ट अटॅक, डायबिटीज ठेवतो कंट्रोलमध्ये?

पीएफसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता; वेतन मर्यादा १५००० रुपयांवरुन २१००० रुपये होणार

कुशल बद्रिकेनंतर ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची ‘मॅडनेस मचाएंगे’मध्ये एन्ट्री, टीझर VIRAL