पीएफसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता; वेतन मर्यादा १५००० रुपयांवरुन २१००० रुपये होणार
नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पीएफ(pf) अकाउंट असते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे दर महिन्याला काही पैसे जमा केले जातात. याचसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारी पातळीवर सामाजिक सुरक्षा कव्हरेज वाढवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत वेतन मर्यादा ही १५,००० रुपयांवरुन २१,००० रुपये होण्याची शक्याता आहे.
केंद्र सरकार लवकरच ईपीएफ(pf) वेतन मर्यादा वाढवण्याच्या तयारीत आहे. याआधी २०१४ मध्ये केंद्र सरकारने पीएफ मर्यादा वाढवली होती. त्यानंतर आता तब्बल १० वर्षांनी ईपीएफबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये पीएफ वतन मर्यादा ६,५०० वरुन १५००० रुपये करण्यात आली होती.
पीएफ वेतन मर्यादेत वाढ झाल्याचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होण्यार आहे. अनेक राज्यांमध्ये किमान वेतन हे १८००० ते २५००० रुपये आहे. या निर्णयाचा परिणाम ईपीएफ योजना आणि कर्मचारी निवृत्ती योजनामध्ये गुंतवलेल्या रक्कमेवरही होणार आहे. याचसोबत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर हा परिणाम होणार आहे.
कर्मचारी पेन्शन योजना खात्यातील योगदानाची गणना मूळ वेतन १५,००० रुपये प्रति महिना या आधापावर केली जाते. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमधून १८०० रुपये कट केले जातात. यानुसार आता वेतन मर्यादा २१००० रुपये झाल्यावर त्याचा परिणाम ईपीएसवरदेखील होणार आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांचे १,७४९ रुपये कापले जातील.
हेही वाचा :
विराट कोहलीने भर मैदानात सर्वांसमोर का धरले कान Video Viral
पंकजा मुंडेंचं टेन्शन वाढलं; ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार बीड लोकसभेच्या रिंगणात
हातकणंगलेत तीन अपक्ष आमदारांची बंद खोलीत चर्चा; कोरे-आवाडे- यड्रावकरांचं काय ठरलं