नाशिक जिल्ह्यात एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. दहा महिन्यांच्या बालकाचा(baby ) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे दहा महिन्यांचा चिमुकला खेळता खेळता पाण्याच्या बादलीत पडल्याने त्याची प्राणज्योत मालवली.
नाशिकमधील देवळालीगाव येथील रोकडोबावाडी येथील मशिदीजवळील रहिवासी अजय तायडे यांचा दहा महिन्यांचा मुलगा रोशन हा बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरात खेळत होता. बाळ(baby ) खेळत असल्याचे समजून त्याची आईदेखील स्वयंपाकघरात गुंतली होती. मात्र काही वेळाने रोशनचा काहीच आवाज नाही म्हणून त्या स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. मात्र घरात कुठेच तो आढळून आला नाही. तेव्हा रोशनची शोधाशोध सुरू झाली.
रोशन घरात खेळत असताना तो पाण्याने भरलेल्या बादलीजवळ गेला. खेळता-खेळता तो बादलीत पडला अन् नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा गुदमरल्यामुळं जीव गेला. रोशन कुठेच सापडत नाही म्हणून घरच्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र नंतर तो कुटुंबीयांना पाण्याच्या बादलीत पडलेला आढळून आला. त्यानंतर त्याच्या आजोबांनी त्याला बिटको रुग्णालयात दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, मुलांवर(baby ) डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याची गरज असल्याचेही समोर आले आहे. 10 वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे. आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.
नाशिकप्रमाणेच संभाजीनगरमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. घराजवळ खेळत असलेल्या दीड वर्षीय चिमुकल्यावरून आई-वडिलांची नजर हटली आणि चिमुकल्याचा घरा पाठीमागील शोष खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मन हेलावून टाकणारी घटना छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये घडली आहे. घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शोष खड्ड्यातील पाण्यात बुडून एका दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. तैमूर तश्कील मोमीन असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :