सोशल मीडियाचे व्यसन आता लोकांचे जीवही घेऊ लागला आहे. याचे अनेक उदाहरण याआधीही आपल्या डोळ्याखालून गेले आहेत मात्र तरीही लोक काही सुधारत नाही आणि नको त्या ठिकाणी नको ते प्रकार करू पाहतात. परिणामी त्यांना आपला जीव गमवावा लागतो.
शुल्लक लाइक्ससाठी लोक स्वतःच्या जीवचाही खेळ करू लागले आहे. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यातील दृश्ये इतके थरारक आहेत की ते तुमच्या अंगावर काटा आणू शकतात. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक चिमुकली समुद्रकिनारी आपला व्हिडिओ शूट करत असल्याचे दिसून येते. तिचा हा व्हिडिओ तिची आई आपल्या कॅमेरात कैद करत असते आणि मुलगी वेगवगेळ्या पोज देत असते. मात्र यावेळी आजूबाजूचे वातावरण चांगलेच खवळल्याचे दिसून येते.
समुद्रकिनारी असे व्हिडिओज बनवणे आपल्या जीवासाठी धोक्याचे ठरू शकते कारण समुद्रकिनारी भरती ओहोटी सारखी सुरु असते अशात जर पाण्याच्या लाटांनी आपल्याला आत खेचले तर यातून बाहेर पडणे आपल्यासाठी फार कठीण होऊ शकते. व्हिडिओतही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले.
व्हिडिओमध्ये असे दिसते की एक लहान मुलगी समुद्रकिनाऱ्यावर खूप आनंदाने खेळत व्हिडिओसाठी पोज देत आहे. व्हिडिओमध्ये तिच्या आजूबाजूने समुद्राच्या लाटा खवळल्याचेही दृश्य दिसून आले. तिची आई आपल्या मोबाईलच्या कॅमेरात हे दृश्य कैद करत असते आणि अशात अचानकच समुद्राच्या लाटा उसळतात आणि चिमुकलीला आपल्या सोबत पाण्यात घेऊन जातात.
हे सर्व लक्षात येताच मुलीची आई धावत तिला वाचवायला जाते, तिथे उपस्थित असलेले लोकही यावेळी आवाज करू लागतात आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. पुढे काय घडले ते मात्र व्हिडिओत स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार शेअर करण्यात येत आहे.
यह लापरवाह मां अपनी बेटी की समुंदर के किनारे Reel बना रही थी, लेकिन यह पल सेंकडों में खौफनाक मंजर में बदल गया।
समुंदर की ऊंची लहरें इस बच्ची को समुंदर में खीच ले गईं।
समुद्र बहुत सुंदर है, लेकिन साथ में निर्दयी भी है। कभी मत भूलिए कि इसकी ताकत कितनी जल्दी जानलेवा बन सकती है। pic.twitter.com/4iOQ8Lx2vf
— Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) June 10, 2025
सुरवातीला आनंदी वाटणारा हा व्हिडिओ अचानक भयानक वळण घेते जे सर्वांचाच थरकाप उडवून जाते. व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप समजले नसले तरी त्याला वेगाने शेअर केले जात आहे. लोक व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.
एका युजरने लिहिले आहे, “कृपया आम्हाला सांगा की मूल जिवंत आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रीलने सुशिक्षित आणि अशिक्षित दोघांनाही मानसिक गुलाम बनवले आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यात तिच्या आईची चुकी आहे”. घटनेचा व्हिडिओ मात्र @Sheetal2242 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा :