उर्फीला हवीय नोकरी! म्हणाली- पोटापाण्यासाठी तरी काम द्या…
उर्फी जावेद तिच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते(give). ती नेहमीच तिच्या चित्र विचित्र स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेत असते. बरेचदा तिला तिच्या विचित्र ड्रेसमुळे अनेकदा ट्रोल व्हावे लागले आहे. असे असूनही उर्फी हेडलाइनमध्ये चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत असते. मात्र आता उर्फीवर वाईट दिवस आल्याचे दिसते कारण तिने सोशल मीडियावर स्वत:चा बायोडाटा शेअर करत तिच्यासाठी नोकरी शोधण्याची विनंती केली आहे.
उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर(give) एक फोटो शेअर केला आहे. त्यात कॅप्शनमध्ये लिहिले की, “रिसेप्शनिस्ट म्हणून काम करण्यास तयार!!! होय, मी नोकरी शोधत आहे… कारण ३१ मे खरोखर जवळ आला आहे आणि माझे फॅशन इन्फ्लूएन्स धोक्यात आहे. आता मला माझ्या पोटापाण्यासाठी काहीतरी करावेच लागेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सगळ्या सूचनांचे पालन केले जाईल मित्रांनो!
३१ मे पूर्वी उर्फीने तिच्या रेझ्युमेमधील अनुभव कॉलममध्ये मनोरंजक गोष्टी लिहिल्या आहेत. तिने लिहिले आहे की, “जर मी ट्रोल हाताळू शकते, तर मी तुमचे कॉल देखील हाताळू शकते.” Urfi च्या या पोस्टवर यूजर्स खूप कमेंट करत आहेत. काहींनी तिला नोकरीची ऑफर दिली. तर काहींनी सांगितले की तिला नोकरीची काय गरज? काहींनी अभिनेत्रीच्या पोस्टची खिल्ली उडवली आहे.
उर्फीने टीव्ही अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरची सुरुवात मेरी दुर्गा, सात फेरो की हेरा फेरी, कसौटी जिंदगी की अशा अनेक मालिकांमधून केली. बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर उर्फी प्रसिद्धीच्या झोतात आली. हटके कपड्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे तिला खूपदा ट्रोलही व्हावे लागले आहे. पण याचा उर्फीवर काहीही परिणाम होत नाही. ती वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी तिच्या विचित्र कपड्यांमध्ये दिसते.
हेही वाचा :
मुनव्वर फारूकीने गुपचूप उरकलं दुसरं लग्न? प्रसिद्ध सेलिब्रिटींनी लावली हजेरी
लस्सी प्या आणि तंदरुस्त राहा; आरोग्यावर होणारे भन्नाट फायदे…
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या