कोल्हापुरात नवा पॅटर्न; बंटीपाटील, मालोजीराजे vs महाडिक, मुश्रीफ, क्षीरसागर

सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (pattern)आणि काँग्रेस त्यांनी शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. आगामी निवडणुकीत तसे चित्र निर्माण होणे कठीण आहे.

 राज्यातील सत्ता बदल आणि लोकसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात महत्त्वाचच्या बदलाची आणि संकेतांची चाहूल लागली आहे. ज्या पद्धतीने कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात शिवसेनाराष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन पहिल्यांदा महाविकास आघाडीची स्थापना केली. त्याच पद्धतीने पुढील काही वर्षात राज्यात देखील शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले.

पण सध्याच्या घडीला शिवसेनेतील फूट आणि राष्ट्रवादीतील फूट महत्त्वाची आहे. त्यातच राज्यातील सत्तापालटाचा आणि लोकसभा निवडणुकीचा कोल्हापूरच्या महानगरपालिका निवडणुकीत त्याचा परिणाम होणार आहे. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि (pattern)काँग्रेस त्यांनी शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. आगामी निवडणुकीत तसे चित्र निर्माण होणे कठीण आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेतयापूर्वी स्थानिक आघाडी आणि पक्षीय राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसते. मात्र त्यानंतर महानगरपालिकेच्या राजकारणात काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक , उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेच्या राजकारणात एन्ट्री केली.

गेल्या 10 वर्षाच्या पाठी मागे कोल्हापूर महानगरपालिकेवर महाडिकांची सत्ता होती. मात्र तोच महाडिक पॅटर्न वापरून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांनी महाडिक गटाची सत्ता उलथवून टाकली.(pattern) सध्या कोल्हापूर महानगरपालिकेचे चित्र वेगळं आहे. त्यासोबत सध्या जिल्ह्याचे राजकारण ही बदलले आहे. जिल्ह्याचे राजकारणात विनय कोरे हे महाडिक यांच्यासोबत आहेत. हसन मुश्रीफ हे देखील महायुतीत आहेत. गतवेळच्या महापालिका निवडणुकीत आमदार सतेज पाटील हसन मुश्रीफ आणि राजेश क्षीरसागर यांनी एकत्र येऊन महापालिकेत सत्ता स्थापन केली होती.

सध्या कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण पाहता शिवसेनेतील दोन गट कार्यरत आहेत. महायुतीत असणारे खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, तर राष्ट्रवादीतील अजितदादा यांच्यासोबत असणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे देखील सध्या महायुतीत भाजपसोबत आहेत. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे सुद्धा महायुतीत आहेत. बदलत्या समि‍करणामुळे शाहू महाराजयांना उमेदवारी दिल्याने आमदार सतेज पाटील आमदार पी. एन पाटील, माजी आमदार मालोजीराजे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील, शिवसेनेचे उपनेते संजय पवार हे महाविकास आघाडीत आहेत.

मागील काही वर्षातील कोल्हापूर महापालिकेसह जिल्ह्यातील राजकीय बसलेली घडी राज्यातील सत्तापालटामुळे उलटली आहे. ही घडी विस्कळीत झाल्याने त्याची समीकरणे ही बदलली आहेत. जर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत राज्यातील महायुतीची जोड कायम राहिली तर कोल्हापूर महानगरपालिकेत महाडिक, मुश्रीफ आणि शिरसागर विरुद्ध सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती असा वेगळा गट तयार झालेला दिसेल.

हेही वाचा :

बारावीत कमी गुण मिळाले? टेन्शन नको! शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच आघाडी

45 पैशांत प्रवाशांना 10 लाखांचा विमा; काय आहे रेल्वेचा विमा