निकाल काहीही लागो, आमचा विठ्ठल एकच समर्थकांची बॅनरबाजी
पराभवानंतर बारामतीत अजित पवार समर्थकांची बॅनरबाजी पाहायला मिळत (banner)आहे. निकाल काहीही असला, तरी आमचा विठ्ठ्ल एकच असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे.बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर आता बारामतीत कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले आहेत. ‘निकाल काहीही लागो, आमचा विठ्ठल एकच अजितदादा’ अशा आशयाचा बॅनर बारामतीत लागल्याने मोठी चर्चा रंगली आहे.
निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर बारामतीत बॅनर लागले आहेत. या बॅनरवर सुरवात तुमच्यापासून आणि शेवटही तुमच्या सोबतच, असा उल्लेख करण्यात आला आहे. हे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विशाल जाधव यांनी लावले असल्याची माहिती मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवारांचे कार्यकर्ते अजित पवारांच्या समर्थनार्थ पुढे आल्याचं दिसत आहेत.
बारामतीतील अजित पवारांचे कार्यकर्ते विशाल जाधव यांनी (banner)’निकाल काही लागो आमचा विठ्ठल एकच अजित दादा’ अशा आशयाचा फलक लावला आहे. त्यांनी अजित पवारांना सहानभूती देण्याचा प्रयत्न केला आहे. बारामती शहरातल्या देसाई स्टेट भागात हा बॅनर लावण्यात आला आहे. समर्थक पराभवानंतर अजित पवारांना सहानभूती देताना दिसत आहे. समर्थक पराभवानंतरही अजित पवारांच्या सोबत असल्याचं दिसत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाच्या सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्यात चुरशीची (banner)लढत झाली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे. सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाल्याचं दिसलं. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला आहे, त्यामुळे अजित पवार गटात नाराजीचं चित्र आहे, तर कार्यकर्ते आधार देताना दिसत आहेत.
हेही वाचा :
पाणीटंचाईचा मोठा फटका! भाजीपाल्याचे दर कडाडले, नागरिक हैराण
टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात कॅप्टन Rohit Sharma जखमी
मोठी बातमी! चिमुकल्यांची किलबिल कानी पडणार, १५ जूनला शाळेची घंटा वाजणार