‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कोणालाच नको होते’ राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट(primer blast) केला आहे. एकनाथ शिंदे CM पदी नकतो असं अजित पवार आणि सुनिल तटकरेंनी सांगितलं होतं, असं संजय राऊतांनी म्हटलंय. एवढेच नव्हे तर भाजपलाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको होते. एकनाथ शिंदे ज्युनिअर असल्याने अजित पवारांना ते नको होते, असे ते म्हणाले. 2019 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कोणालाच नको होते असे ते म्हणाले.

शिवसेनेत 2 गट पडले. यानंतर एकनाथ शिंदे(primer blast) हे भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले. पण 2019 साली शिंदे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार, तटकरे, वळसे-पाटलांना नको होते…भाजपच्या नेत्यांसह फडणवीसांचीही भूमिका तीच होती, असे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको. आम्ही सिनीअर आहोत. आम्ही ज्युनिअर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही, असे म्हणणारे अजित पवार, सुनिल तटकरे आणि दिलीप वळसे पाटील म्हणाले होते, असे राऊत म्हणाले. दिल्लीचा निर्णय काहीही असो, आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नकोयत, असे देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांचे म्हणणे होते.

जनमानस विरोधात जात असल्याची जाणीव भाजपला झाली, त्यामुळेच मोदींनी विखारी, धार्मिक, वैयक्तिक पातळीवर प्रचार आणि हल्ले सुरु केले असं निरीक्षण शरद पवारांनी नोंदवलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी हे विधान केलंय.

सातपैकी चार टप्प्यातील मतदान पार पडल्यावर मोदींना मिळणारा प्रतिसाद कमी झाल्याचं जाणवतंय. विशेषत शेतकरी आणि तरुण वर्ग भाजपच्या विरोधात गेलाय. हे मोदींच्याही लक्षात आलंय. त्यामुळेच त्यांनी हिंदू-मुस्लिम असा प्रचाराला रंग दिल्याचा घणाघात शरद पवारांनी केलाय.

हेही वाचा :

कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट

वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बीट डोसा