‘पुष्पा २’ मध्ये समांथा रुथ प्रभू नाही तर ‘हि’ नॅशनल क्रश गाजवणार चित्रपट

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी ‘ॲनिमल’ चित्रपटामुळे(crush) कमालीची चर्चेत आली होती. या चित्रपटापासून तिच्या प्रसिद्धीत तुफान वाढ झाली आहे. या चित्रपटानंतर तृप्तीच्या पदरी अनेक नवनवे चित्रपट आलेले आहेत. अशातच आता तृप्तीच्या पदरी आणखी एक नवा प्रोजेक्ट आलेला आहे. अल्लू अर्जुनच्या बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटात तृप्ती डिमरी दिसणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. या चित्रपटात ती समांथा प्रभुची जागा घेणार असल्याचं बोललं जात आहे.

तेलुगू ३६० च्या माहितीनुसार, तृप्ती डिमरी ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचा भाग होणार(crush) आहे. या चित्रपटामध्ये ती अल्लू अर्जुनसोबत एकत्र डान्स करणार आहे. मुख्य गोष्ट म्हणजे, तृप्ती डिमरी समांथा रुथची जागा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तृप्ती डिमरी कोणत्या गाण्यात दिसणार ? अशी सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

समांथाने ‘पुष्पा: द राईज’मध्ये, ‘ऊ अंटावा’ या आयटम साँगमध्ये तिने अफलातून डान्स केलेला आहे. प्रेक्षकांनी तिच्या ह्या डान्सचे जोरदार कौतुक केले होते. आतापर्यंत ‘पुष्पा २: द रुल’मधील एकच गाणं रिलीज झालेले आहे.

‘पुष्पा २’ चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.. ५०० कोटींच्या बजेटमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा २’चा समावेश असणार आहे.

‘पुष्पा’प्रमाणेच ‘पुष्पा २: द रुल’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करेल, यामध्ये शंका नाही. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदानाही स्क्रीन शेअर करणार आहे. तर फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

हेही वाचा :

लाईव्ह सामन्यात शाहरुख खानकडून मोठी चूक! मागावी लागली माफी

आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही

वेदांत अग्रवाल याचा जामीन फेटाळला, बाल सुधारण गृहात ठेवण्याचा निर्णय