14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला डेट करतेय शिवांगी? अखेर सोडलं मौन

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत नायराची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री(actor) शिवांगी जोशी सध्या ‘बरसातें’ या मालिकेमुळे तुफान चर्चेत आहे. या मालिकेत ती अभिनेता कुशल टंडनसोबत काम करतेय. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर हिट ठरतेय. पण त्याचसोबत खऱ्या आयुष्यातही शिवांगी आणि कुशल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नव्हे तर हे दोघं लवकरच साखरपुडा करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. या चर्चांवर अखेर शिवांगीने मौन सोडलं आहे. तिने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित नाराजी व्यक्त केली आहे.

‘माझ्या शब्दांना चुकीच्या पद्धतीने मांडल्याने आणि त्यातून चुकीचा अर्थ काढल्याने मी काही लोकांवर खूप नाराज आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात मला सोशल मीडियावर(actor) होणाऱ्या अफवांविषयी सर्वसाधारण प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मी म्हणाले, “अफवा त्यासाठीच असतात ना? त्या येतात आणि जातात.” दुर्दैवाने माझ्या या उत्तरातून चुकीचा अर्थ काढला गेला आणि त्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना बराच त्रास सहन करावा लागला’, असं तिने लिहिलं.

यापुढे ती म्हणाली, ‘मी नेहमी माझ्या वैयक्तिक आयुष्याचं खासगीपण जपलंय आणि त्याबद्दल सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर बोलणं नेहमीच टाळलं आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करते की माझ्या खासगी आयुष्याचा आदर करा. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. पण एखाद्याच्या सर्वसामान्य वक्तव्याचा फायदा उचलून ट्रोल करणं चुकीचं आहे. मी प्रत्येकाचा आदर करते आणि समोरच्या व्यक्तीनेही माझा आदर करावा अशी अपेक्षा आहे.’

याआधी कुशलनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित शिवांगीसोबतच्या साखरपुड्याच्या चर्चांना नाकारलं होतं. कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं, ‘मला एक गोष्ट सांगा की माझा साखरपुडा होतोय आणि त्याबद्दल मलाच माहीत नाही? मी इथे थायलंडमध्ये मार्शिअल आर्ट्स शिकतोय. तुम्ही माझ्यासोबत असं कसं करू शकता? किमान आधी बातमीचे तथ्य तरी तपासा. तुमचे सूत्र कोण आहेत?’

शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘बरसातें’ ही मालिका गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाली होती. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. शिवांगी आणि कुशलच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. शिवांगी 25 वर्षांची तर कुशल 39 वर्षांचा आहे. मालिकेत एकत्र काम करताना दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यांची ही केमिस्ट्री ऑफस्क्रीनसुद्धा झळकायची, म्हणून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा :

विराट कोहली पुढच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार

भाजपच्या कमी जागा आल्यास बाजार कोसळणार?

‘पुष्पा २’ मध्ये समांथा रुथ प्रभू नाही तर ‘हि’ नॅशनल क्रश गाजवणार चित्रपट