लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि.१२) अधिसूचना जारी केली. तिसऱ्या टप्प्यात देशातील १२ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील ९४ लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान पार पडणार आहे.
या निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून शेवटची तारीख १९ एप्रिल आहे. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा नगर हवेली, दीव, दमन, गोवा, जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगाल आदी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान पार पडणार आहे.