“आता लग्न करावंच लागेल” राहुल गांधी असं का बोलले?
रायबरेली लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींना प्रचारादरम्यान(married) एक वेगळाच अनुभव आला. थेट लोकांनीच त्यांना लग्न कधी करणार, असं विचारलं. त्यावर राहुल यांनीही तितक्याच मोकळेपणाने उत्तर दिलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी हे रायबरेलीमध्ये जोरदा(married) प्रचार करत आहेत. सोमवारी ते पुन्हा रॅलीसाठी रायबरेलीमध्ये दाखल झाले होते. जेव्हा राहुल गांधींचं संबोधन संपलं तेव्हा जमलेल्या गर्दीने त्यांना जोरजोरात प्रश्न विचारणं सुरु केलं.
गर्दीने एकच प्रश्न वारंवार उपस्थित केला. ‘तुम्ही लग्न कधी करणार?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात येत होता. त्यावर राहुल गांधींनी जवळच्या लोकांना विचारलं, की लोक काय विचारत आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतःच उत्तर दिलं. ”आता लवकरच लग्न करावं लागेल” या त्यांच्या उत्तराने उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
दरम्यान, केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोन लोकसभा मतदारसंघांमधून उभे आहेत. त्यांच्या वायनाडच्या जागेवर आधीच मतदान पार पडलं आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशातल्या रायबरेली मतदारसंघातूनही ते उमेदवार आहेत. रायबरेलीमध्ये २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
हेही वाचा :
धाराशिव शहराच्या नावामागचा जाणून घ्या रंजक असा इतिहास
‘धनुष्यबाणाच्या मंचावर राज ठाकरे….’, राजू पाटील यांचं मोठं वक्तव्य
हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी बहुमत सिद्ध करणार?अधिवेशन बोलावण्याच्या तयारी