आपल्या सर्वांनाच नेहमी एक फिट शरीर हवं असतं. जे आपल्या पर्सनॅलिटिला अधिक आकर्षक बनवतं.(weight)पण हे फिट आणि आकर्षक शरीर मिळवण्यासाठी नियमित व्यायाम करावा लागतो. या धावपळीच्या जीवनात सगळ्यांनाच व्यायामाला पुरेसा वेळ देता येत नाही. यामुळे वजन वाढते आणि डायबिटीज, थायरॉईड, पीसीओडी यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. आणि याचा परिणाम आपल्या पर्सनॅलिटिवरही होतो. खरं तर शरीरातील काही नैसर्गिक बदलांमुळे देखील वजन वाढते. म्हणून हे बदल ओळखून व्यायामासह शरीराची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
बऱ्याचजणांना बाहेर पडल्यावर सारखं काही न काही खायची सवय असते. यामध्ये जास्तीत जास्त पॅकेज्ड फूड्सचा समावेश असतो. या पॅकेज फूड्समध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचा आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचा वापर केला जातो. यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि ते अतिरिक्त वजन वाढीचे मोठे कारण ठरते. (weight)यामुळे शरीरातील इन्सुलिन नियंत्रित ठेवण्यासाठी पॅकेज्ड फूड्स खाणं टाळलं पाहीजे.काहीवेळा खाण्यापिण्याच्या वेळींवर दुर्लक्ष केले जाते. अवेळी खाणे किंवा पुरेसे न जेवणे यामुळे पोटात, छातीत जळजळ होते. आपण काही असे पदार्थ खातो ज्यामुळे अॅसिडिटी होते. ही अॅसिडिटी देखील वजन वाढीचे एक कारण आहे. यामुळे शरीराची कार्यक्षमता कमी होते आणि अतिरीक्त चरबी वाढते. जास्त साखर असलेले, प्रक्रिया केलेले, तळलेले, चरबीयुक्त मांस आणि डेअरी प्रोडक्ट शिवाय मैदा, ट्रान्स फॅट असलेले बेकरी उत्पादने असे जळजळ वाढवणारे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांनी या सर्व गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण दरमहा येणाऱ्या मासिक पाळीमुळे स्त्रियांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल घडत असतात आणि हे देखील वजन वाढीचे एक मुख्य कारण आहे. याकाळात मूडस्विंग्समुळे स्त्रियांना सतत बाहेरचे तेलकट चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. (weight)ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. म्हणूनच विशेषत: स्त्रियांनी वजन कमी करण्यासाठी खाण्याच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
हेही वाचा :