हार्ट अटॅक येण्याच्या २ दिवसांपूर्वी दिसतात ‘ही’ लक्षणं; वेळीच व्हा सतर्क

छातीत अचानक वेदना होणं किंवा जळजळ होणं असा त्रास (sensation)आपल्याला झाल्यावर अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण जर ही किरकोळ दिसणारी चिन्हे एक मोठी धोक्याची घंटा असतील तर? हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही. हा झटका येण्यापूर्वी तुम्हाला काही लक्षणं दिसून येतात.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अनेकजण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. आपल्याला थकवा जाणवते असेल या विचाराने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र जर वेळीच ही लक्षणं ओळखली तर आणि सतर्क राहिलो तर तुमचा जीव वाचू शकतो.

हार्ट अटॅकच्या ४८ तास अगोदर दिसणारी लक्षणं
हार्ट अटॅकच्या १-२ दिवसांपूर्वी अनेकांना छातीत जडपणा, जळजळ किंवा दाब जाणवू शकतो. ही वेदना कधीकधी छातीच्या मध्यभागी देखील होऊ शकतो. याशिवा अनेकांना डाव्या हाताला किंवा पाठीत देखील वेदना होतात.रिझल्ट्स देईल जपानी वॉकिंग टेकनिक; डॉक्टरांनी सांगितली वॉकिंगची पद्धतविश्रांती घेतल्यानंतरही तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा शरीर अचानक सुस्त वाटत असेल तर हे हृदयविकाराचे एक (sensation)प्रमुख लक्षण मानलं जातं.

जर तुम्हाला कोणताही व्यायाम न करताही श्वास लागत असेल तर किंवा पायऱ्या चढण्यास त्रास होत असेल तर हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं.कोणत्याही कारणाविना पोट खराब होणं, उलट्या होणं किंवा चक्कर येणं हे देखील हृदयाची स्थिती दर्शवते.उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाच्या रुग्णांनी(sensation)सावधगिरी बाळगली पाहिजे.

लठ्ठपणा आणि तणावाशी असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.धूम्रपान करणाऱ्यांनाही याचा धोका अधिक आहे.ज्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये यापूर्वीच हृदयाच्या आजारांचा धोका आहे.जर तु्म्हाला यापैकी कोणतीही लक्षणं आढळली तर ताबडतोब रूग्णालयात जाऊन ईसीजी काढावा.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका.डॉक्टरकडे जाण्यास उशीर लावू नका.

हेही वाचा :

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी मेगाभरती 

एसटी महामंडळात काम करण्याची इच्छा असणारांसाठी मोठी आनंदाची बातमी!

पक्ष तोडण्याची लायकी पाकिस्तान तोडण्याची नाही संजय राऊतांचं मोदींवर टीकास्त्र