सध्या जोरदार धुळीचे वादळ सुरू असून लोकांसाठी बाहेर जाणे कठीण झाले आहे. या वादळामुळे त्वचेवर घाण साचते, ज्यामुळे मुरुमे आणि इतर त्वचा समस्यांचा धोका वाढतो. अशा धुळीच्या वातावरणात चेहऱ्याची योग्य देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य काळजी घेतल्यास त्वचेचे नुकसान टाळता येते आणि त्वचा निरोगी राहते. चला, अशा परिस्थितीत चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊया.
वादळी हंगामात बाहेरून घरी आल्यावर त्वरित चेहरा स्वच्छ करा. प्रथम पाण्याने हलके पुसून, नंतर क्लिंजिंग मिल्क लावा आणि कापसाच्या पॅडने स्वच्छ करा. शेवटी सौम्य फेस वॉशने चेहरा धुवा. यामुळे त्वचा पूर्णपणे स्वच्छ आणि ताजी राहील.
यामुळे त्वचा पूर्णपणे स्वच्छ आणि ताजी राहील चेहऱ्याच्या त्वचेची नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी योग्य फेसपॅक वापरा. मुलतानी माती, गुलाबजल, मध किंवा कोरफडी जेल, हळद आणि दूध यांचा फेसपॅक तयार करून वापरल्यास त्वचा तजेलदार आणि उजळ दिसेल. नियमित वापरामुळे चेहरा निरोगी चमकदार राहतो.
हेही वाचा :