कांद्याचा भाव अचानक कोसळला?; शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक, लिलाव पाडला बंद

कांद्याला(onion) याेग्य भाव मिळत नसल्याने अहमदनगर शहरातील कांदा मार्केट मधील कांदा लिलाव आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बंद पाडला. यावेळी पदाधिका-यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना अपशब्द देखील वापरले.

कांद्यावरील(onion) निर्यात बंदी नुकतीच उठविण्यात आली. यामुळे कांद्याचा भाव वधारला आहे. दरम्यान नगर येथील कांदा मार्केट मध्ये आज कांद्याचा भाव हजार रुपयांनी गडगडला. यामुळे कांदा मार्केटमध्ये एकच गोंधळ उडाला.

कांद्याचे भाव कोसळल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिका-यांनी कांदा लिलाव बंद पाडला. व्यापारी संगमत करून शेतकऱ्यांना कांदा भाव देत नसल्याचा आरोप पदाधिका-यांनी केली.

यावेळी पदाधिका-यांनी कांदा व्यापा-यांचा गुजरातशी संगनमत करुन शेतक-यांवर अन्याय सुरु असल्याचे म्हटले. जिल्हाधिकारी आल्याशिवाय लिलाव सुरु हाेऊ देणार नाही अशी भूमिका पदाधिका-यांनी घेतली.

हेही वाचा :

तर शिंदे हे तडीपार होतील अथवा जेलमध्ये जातील; कुणी केला दावा

जेंव्हा उघड्यावर अंघोळ करताना दिसली श्वेता तिवारी, मोठा गोंधळ आणि..

मुंबईत धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग, जीवाच्या आकांताने रस्त्यावर उडी मारली