सोमवती अमावस्येला वर्षातले पहिले सूर्यग्रहण या ४ राशींनी राहा सावध

सोमवती अमावस्यात ८ एप्रिलला सोमवारी आहे, आणि याच दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. सूर्यग्रहणाला(dvt eclipse) धर्मात आणि विज्ञानातही मोठे महत्त्व आहे. धार्मिक शास्त्रांचा जर विचार केला तर सूर्यग्रहण शुभ मानले जात नाही. सूर्यग्रहणाच्या काळात सूर्य राहूने ग्रासला जातो, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसले तरी याचा प्रभाव देशावर जगावर होणार आहे. तसाच हा प्रभाव मेष ते मीन अशा सर्वच राशींवर होणार आहे. यातील काही राशींना ग्रहण शुभफलदायी ठरेल तर काही राशींना सावध राहावे लागणार आहे. आपण सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम कोणत्या राशींवर होईल ते जाणून घेऊ.


मिथुन राशीवर सूर्यग्रहणाचा प्रभाव
मिथुन राशीवर सूर्यग्रहणाचा मध्यम प्रभाव राहील. या काळात पैशांची देवाणघेवाण, वाहन चालवण्यात तसेच इतर सर्वच बाबतीत सावध राहावे लागणार आहे. कष्टाने कमवलेले पैसे खर्च करताना सावध राहा (dvt eclipse)अन्यथा कर्ज घ्यायची वेळी येईल. वैवाहिक जीवनात गैरसमज वाढतील, त्यामुळे तुमच्यातील आनंद कमी होईल. सूर्यग्रहणामुळे तुमची प्रतिकार क्षमता कमी होईल, त्यामुळे तुमच्या समोर विविध समस्या उभ्या राहतील.

कर्क राशीवर सूर्यग्रहणाचा प्रभाव
सोमवती अमावस्येच्या दिवशी होत असलेल्या ग्रहणाचा प्रभाव कर्क राशीवर मिश्र फलदायी आहे. या काळात काही वेळा परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर जाईल आणि ज्या गोष्टींकडून तुम्हाला अपेक्षा आहेत, त्यातच तुम्हाला नैराश्य हाती येईल. नोकरदार व्यक्तींनी सावध राहून काम करावे अन्यथा अनावश्यक वाद होऊन कार्यक्षेत्रात कठोर संघर्षाची वेळ येऊ शकते. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला व्यापारात फार लक्ष द्यावे लागेल आणि पैशाशी संबंधित विषयांकडे विशेष लक्ष द्यावे.

वृश्चिक राशीवर सूर्यग्रहणचा प्रभाव
सूर्यग्रहणाचा प्रभाव वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात चढउतार घेऊन येत आहे. या काळात तुमच्या व्यवसायिक आणि खासगी जीवनात सावध राहावे लागणार आहे. कौटुंबिक जीवनात कुटुंबातील सदस्यांसोबत (dvt eclipse)वादविवाद होतील, ज्यामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. नोकरदार व्यक्तींची जर नोकरीत बदल करण्याचा विचार असेल तर तर तुम्हाला थांबवण्याचा सल्ला देत आहोत. कामाच्या ठिकाणी धावपळ होईल, याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या आरोग्यावर पडेल.

कुंभ राशीवर सूर्यग्रहणाचा प्रभाव
कुंभ राशीच्या लोकांच्या आरोग्यावर सूर्यग्रहणाचा प्रभाव पडणार आहे.त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. ग्रहणाच्या प्रभावमुळे तुमच्या समाधानाची भावना असणार नाही आणि तुमच्यावर कामाचा अधिकाधिक दबाव असेल. या काळात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यवसायिकांची धावपळ जास्त होईल पण लाभ अपेक्षेपेक्षाही कमी असेल. या काळात पैशांच्या गुंतवणुकीपासून सावध राहा कारण पैसे अडकून पडू शकतात. जर तुम्ही एखादी मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर कायदेशीर बाबींकडे विशेष लक्ष द्या.

हेही वाचा :

धैर्यशील माने लोकसभेत दिसणार नाहीत ?

भुजबळ लोकसभेला उभे राहुद्या मग सांगतो मनोज जरांगेंचा मोठा इशारा

हेलिकॉप्टरने माणसं आणू, पण मतदान … हसन मुश्रीफ