पोरींचा राडा… भररस्त्यात तुफान हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

भररस्त्यात तरुणींचा हा राडा येणा- जाणारे वाहनचालकही पाहत होते. त्यापैकीच एकाने ही घटना (ufc fight night)मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी थरकाप उडवणारे अपघात, दे दणादण मारामारी तर कधी जबरदस्त डान्सचे हे व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये भररस्त्यात जोरदार राडा झाल्याचे दिसत आहे.

छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये मुलींच्या दोन गटांमध्ये राडा झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याठिकाणी मुलींच्या दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर प्रकरण इतके बिघडले की (ufc fight night)दोन्ही गटात तुफान हाणामारी सुरू झाली. भररस्त्यात तरुणींचा हा राडा येणा- जाणारे वाहनचालकही पाहत होते. त्यापैकीच एकाने ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

व्हायरलहोत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुली एकमेकांचे केस इतके ओढत जोरदार मारामारी पाहत असल्याचे दिसत आहे. कोतवाली परिसरातील रिव्हर व्ह्यू चौपाटीजवळ ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मारामारीत काही मुलीही जखमी झाल्या आहेत. मात्र ही (ufc fight night)मारामारी का झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी अद्याप कोणती ही तक्रार आलेली नाही आणि मुलींची ओळख पटली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मुलींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा :

कोल्हापुर : शाहू महाराजांना संसदेत पाठवण्यासाठी मविआची वज्रमूठ सभा

हेलिकॉप्टरने मतदार आणण्याची तयारी, त्यांनी किती पैसा गोळा केला जयंत पाटील यांची हसन मुश्रीफांवर सडकून टीका

 धो धो कोसळणार आज राज्यात अवकाळी पावसाची शक्यता