पंढरपुरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार
दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार असल्याची माहिती विठ्ठल- रुक्मिणी मंदिर(close up) समितीन दिले आहे. आज मंदिर समितीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.पंढरपुरच्या विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी.
गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल- रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार असल्याची माहिती विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने दिली आहे. आज मंदिर समितीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत (close up)असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरात संवर्धन आणि सुशुभिकरणाचे काम सुरू असल्याने 15 मार्चपासून पदस्पर्श दर्शन बंद होते. आता आषाढी वारीची चाहूल लागल्याने मंदिरातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यातील काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर येत्या दोन जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे
15 मार्चपासून ते संवर्धन आणि शिशुभकरणाच्या कामासाठी विठ्ठल रुक्मिणीचे(close up) पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते. आता मंदिराचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे उर्वरित 30 टक्के कामासाठी ही अवधी लागणार आहे. मात्र आता आषाढी वारीनिमित्त मंदिरातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले आहेच तसेच आषाढी यात्रेच्या निमित्ताने 7 जुलै पासून देवाचे 24 तास दर्शन सुरू राहणार आहे.
हेही वाचा :
हैदराबादविरूद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली;निर्णय गोलंदाजीचा
दिनेश कार्तिक आयपीएल २०२५ मध्ये CSK च्या ताफ्यात?
RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ