पादचारी वृद्धा घंटागाडीवर आदळून तिचा मृत्यू

नाशिक :- पादचारी वृद्धा घंटागाडीवर आदळून तिचा मृत्यू झाल्याची घटना (hourglass)धामणकर कॉर्नर परिसरात घडली. नलिनी प्रकाश सातपुते (७२, रा. मखमलाबाद राेड) असे या वृद्धेचे नाव आहे. सोमवारी ( दि. १३ ) सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नलिनी सातपुते या सकाळी दहाच्या सुमारास काकतकर हॉस्पिटलजवळील एका इमारतीबाहेर आल्या. तेथून पायी जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या घंटागाडीच्या मागील बाजूस ट्रॉलीवर तोल जाऊन त्या धडकल्या. त्या बेशुद्ध पडल्याने त्यांना औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णायालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी नलिनी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा –

काँग्रेस नेहरूंच्या चुकांसाठी मोदींना जबाबदार धरतेय,

पाकिस्तानच्या व्हाट्सऍप ग्रुपसोबत महाराष्ट्राच्या तरुणाचा संबंध

बायकोचा दिवाना! पत्नी नांदायला आली नाही म्हणून सात ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी