जोडीदारासोबत ‘या’ योगासनांचा करावा सराव , वैवाहिक जीवन राहील निरोगी

योगा करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे अनेक आजार(healthy) दूर राहतात. तसेच नवरा-बायकोने सोबत योगा करणे देखील फायदेशीर असते. तसेच जोडीदारांमधील नातं देखील घट्ट होते. तुम्ही सुखी आणि निरोगी वैवाहिक जीवनासाठी पुढील योगांचा सराव करू शकता.

बद्ध कोनासन
तुमच्या जोडीदारासोबत(healthy) तुमचं नातं घट्ट करण्यासाठी तुम्ही बद्ध कोनासन करू शकता. स्नायूंना आराम देण्यासोबतच मनालाही शांती मिळते, याला बटरफ्लाय आसन असेही म्हणतात. विशेषतः महिलांसाठी हे खूप फायदेशीर आहे. हा योग करण्यासाठी, सर्वप्रथम जमिनीवर तळवे एकत्र जोडून बसा, आता फुलपाखरू उडत असल्याप्रमाणे पाय हलवावे. यामुळे ओटीपोटाचा भाग मजबूत होतो आणि एक ताण निर्माण होतो. या दरम्यान, हळूहळू श्वास घ्या आणि नंतर श्वास सोडावा.

भ्रामरी प्राणायाम
भ्रामरी प्राणायाम केल्याने वैवाहिक निरोगी राहू शकते. गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या जोडप्यांनी नक्कीच भ्रामरी प्राणायाम करावे, असे तज्ञांचे मत आहे. विशेषत: हे महिलांमध्ये प्रजनन क्षमता वाढवते आणि वंध्यत्वाची समस्या देखील कमी करते. हा योग करण्यासाठी जमिनीवर सरळ बसून डोळे बंद करा, दोन्ही कान अंगठ्याने बंद करा, दोन्ही हातांची पहिली बोट भुवयांच्या वर आणि उरलेली तीन बोटे डोळ्यांवर ठेवा. नाकातून सामान्यपणे श्वास घेताना आपले तोंड बंद ठेवा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

हेही वाचा :

कोल्हापूर: इन्स्टाग्रामवरची ‘भाईगिरी’ पडली महागात

कोल्हापुरात छत्रपती विरुद्ध मंडलीक चुरशीची लढत

Viral Video : बापरे! लग्नात फायर गनची शायनींग पडली महागात