राहुल गांधींचं ट्विट, सांगितला लोकसभेचा निकाल; मोदींनाही काढला चिमटा

‘मी पंतप्रधान यांना आवाहन केलं होतं की, मी चर्चेसाठी तयार आहे, तुम्हीही या,(result) पण ते आले नाहीत.आता चर्चा शक्य नाही, कारणलोकसभेच्या अखेरच्या सातव्या टप्प्याचा प्रचार गुरुवारी (ता.30) संपला. या टप्प्यात सात राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश यांसह एकूण 57 जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे.यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कंगना रनौत , अनुराग ठाकूर,अभिषेक बॅनर्जी या दिग्गज नेत्यांच्या लढतींचा समावेश आहे. प्रचार संपताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं आहे.

खासदार राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताच ट्विट करत (result)काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘बब्बर शेर’ म्हणत कौतुकाचा वर्षाव केला आहे.त्यांनी आपल्या पोस्टमध्ये देशात इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी म्हणाले, आज लोकसभेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता, प्रचार संपला.देशात INDIA आघाडीचं सरकार बनणार आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की, शेवटच्या मिनिटापर्यंत पोलिंग बूथ, EVM मशिन्सवर लक्ष द्या.मी पंतप्रधान यांना आवाहन केलं होतं की, मी चर्चेसाठी तयार आहे, तुम्हीही या, पण ते आले नाहीत.आता चर्चा शक्य नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन व्रतासाठी गेलेत असा टोला त्यांनी लगावला आहे.

राहुल गांधी ट्विटमध्ये काय म्हणाले..?

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी (result)देशातील महान लोकांना अभिवादन करताना मला काँग्रेस कार्यकर्त्यांना आत्मविश्वासाने सांगायचे आहे की,देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे.देशाची राज्यघटना आणि संस्था वाचवण्यासाठी एखाद्या वाघाप्रमाणे उभे राहिलेल्या आघाडीच्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानत असल्याचं म्हटलं आहे.

क्रांतिकारी गॅरंटी…

जनतेच्या चिंतेच्या खऱ्या मुद्द्यांवर निवडणूक लढवण्यात आम्ही यशस्वी झालो आणि पंतप्रधानांनी त्यांना वळविण्याचा वारंवार प्रयत्न करूनही शेतकरी, कामगार, तरुण,महिला आणि वंचितांसाठी आवाज उठवला.समाजातील प्रत्येक घटकाचे जीवन बदलून टाकणाऱ्या पर्यायी दृष्टीच्या रूपात आम्ही देशासमोर क्रांतिकारी गॅरंटी एकत्रितपणे मांडल्या आणि आमचा संदेश प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवल्याचा दावाही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केला आहे.राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत मतदान केंद्र आणि स्ट्राँग रूमवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर: इन्स्टाग्रामवरची ‘भाईगिरी’ पडली महागात

कोल्हापुरात छत्रपती विरुद्ध मंडलीक चुरशीची लढत

राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये 13 वर्षाच्या मुलीसह तिघांचा मृत्यू