‘गुलाबी साडी’नंतर रॅपर संजू राठोडचं नवं गाणं रिलीज

सिनेसृष्टीत कोणताही वारसा नसताना आपलं भक्कम स्थान(new song) निर्माण करत, कला कौशल्याने तसेच जिद्दीवर, स्वबळावर मिळवलेलं हे स्थान या शर्यतीच्या जगात टिकवून ठेवलं आहे ते म्हणजे गायक, दिग्दर्शक संजू राठोड याने. ‘नऊवारी पाहिजे’, ‘बाप्पावाला गाणं’, ‘बुलेटवाली’, ‘गुलाबी साडी’ यांसारखी दमदार व मिलियन व्ह्यूज मिळवलेली गाणी संजूने देत प्रेक्षकांची मन जिंकली. त्याच्या गाण्यांची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. अशातच ‘गुलाबी साडी’ मुळे सर्वाधिक प्रकाशझोतात आलेल्या संजूने नुकतंच एक नवं गाणं रिलीज केलेलं आहे.

सध्या सर्वत्र लगीनघाई सुरू आहे. अशातच संजू राठोडचं ‘Bride तुझी नवरी’ हे गाणं(new song) रिलीज झालेलं आहे. या गाण्याला अवघ्या काही तासातच हजारो व्ह्यूज मिळालेले आहेत. या गाण्यात ‘लागीर झालं जी’ फेम अभिनेता नितीश चव्हाण आणि डान्सर वैष्णवी पाटील थिरकताना दिसत असून संजू राठोडच्या रॅपने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तर या गाण्यामध्ये सहकलाकार म्हणून हृतिक मनी आणि निमरित मनी यांनीही ठेका धरलेला पाहायला मिळतोय.

‘Bride तुझी नवरी’ हे गाणं संजू राठोडचं असून ‘बिग हिट’ मीडिया प्रस्तुत आहे. निर्माते हृतिक मनी आणि अनुष्का सोलवट यांनी या गाण्याच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर गाण्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनिष महाजनने उत्तमरित्या सांभाळली आहे. गाण्याचे बोल संजू राठोडचे असून हे गाणं संजूसह आनंदी जोशी हिने गायलं आहे. तर संगीताची संपूर्ण जबाबदारी गौरव राठोड याने सांभाळली आहे. गुलाबी साडी नंतर आता संजूच्या ‘Bride तुझी नवरी’ या आगामी गाण्याची क्रेझ वाढत असलेली पाहायला मिळत आहे.

‘गुलाबी साडी’ गाण्याची जगभरात क्रेझ पाहायला मिळत आहे. गुलाबी साडीवर अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. कलाकार मंडळींपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाला या गाण्याने भुरळ घातली आहे. या गाण्याचे बोल आणि गाण्याच्या हुकस्टेपने साऱ्यांनाच वेड लावलं आहे. आता या गाण्याच्या भरघोस प्रतिसादानंतर संजू राठोड आणि ‘बिग हिट मीडिया’ नवकोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहे. यंदाच्या हळदी समारंभात हे गाणं आवर्जून वाजेल याची खात्री आहे.

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा…; मनसे पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश

WhatsApp च नवं अपडेट! चॅटिंगपासून स्टेटस अपलोडिंगपर्यंत एकाच वेळी वापरता येणार

‘राहुल गांधी सोबत माझे लग्न…’, आमदार अदिती सिंह यांनी उघडले राज