अहमदाबाद (गुजरात) – शहरातील सॅटेलाईट परिसरात घडलेल्या एका भीषण घटनेने समाज हादरून गेला आहे. पतीवर संशय घेणाऱ्या पत्नीनं (Wife)मध्यरात्री झोपेतच नवऱ्यावर उकळतं पाणी आणि अॅसिड ओतून त्याला गंभीररीत्या भाजलं. ३३ वर्षीय डिलिव्हरी कामगार सध्या सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जीवासाठी झुंज देत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी महिलेला तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या कारणावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. घटनेच्या दिवशी मध्यरात्री (Wife)पती झोपलेला असताना पत्नीनं त्याच्यावरचे ब्लँकेट काढून उकळतं पाणी ओतलं आणि नंतर अॅसिड फेकलं. या भीषण हल्ल्यात पतीच्या पोट, पाठ, मांड्या, हात आणि गुप्त भागांना गंभीर भाजल्या गेल्या आहेत.
जखमी अवस्थेतही पीडितानं रुग्णालयाच्या बेडवरून पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यात त्याने पत्नीकडून झालेल्या अत्याचाराचे संपूर्ण वर्णन केले आहे. हल्ल्यानंतर आरोपी पत्नी घरातून फरार झाली असून पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

तपासात उघड झालं की या दाम्पत्यानं दोन वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केलं होतं आणि दोघांसाठी हे दुसरं लग्न होतं. आरोपी महिलेला पहिल्या पतीपासून सहा वर्षांचा मुलगा आहे. तर सध्याच्या पतीनेही या महिलेशी विवाह करण्यासाठी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. मात्र, लग्नानंतर दोघांच्या नात्यात सतत अविश्वास आणि भांडणाचं वातावरण राहिलं.या अमानुष घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करण्यासाठी तपासाची चक्रं वेगानं फिरवली आहेत.
हेही वाचा :
कोल्हापुरात भीषण अपघात; लक्ष्मी पुजनाच्या दिवशी बहीण- भावाचा मृत्यू…
पवार गटाच्या बड्या नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
“खूप काही घडतंय…”, एंगेजमेंटच्या चर्चा सुरु असताना अखेर रश्मिका मंदाना स्पष्टंच बोलली