चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे मंगळवारी तीव्र हृदयविकाराच्या (heart attack)झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चाळीसगाव आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

देशमुख यांनी २००९ ते २०१४ या काळात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले. आमदार होण्यापूर्वी त्यांनी चाळीसगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या प्रदेश नेतृत्वात उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते.

२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी, कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव कायम होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, विशेषत: लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून त्यांचे नाव चर्चेत होते.

राजीव देशमुख यांच्या अकाली निधनामुळे चाळीसगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शोकाची लाट पसरली आहे. विविध पक्षांतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र दुःख (heart attack)व्यक्त केले आहे. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी पक्षासह चाळीसगावच्या सर्वपक्षीय राजकारणाने एक अनुभवी, संयमी आणि दूरदृष्टी असलेला नेतृत्वकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

१० मिनिटांमध्ये बनवा तोंडात विरघळणारा इन्स्टंट पेढा,

Liquid Glass वर मिळणार आता संपूर्ण कंट्रोल! 

भारतात या ठिकाणी वाहतात 17 नद्या,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *