रोहित कधी नव्हे तो इतका भडकला! IPL च्या या नियमावर केली जोरदार टीका

आयपीएल २०२४ स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा(dream 11 rohit sharma) पुढील सामना पंजाब किंग्ज संघाविरुद्ध रंगणार आहे. हा सामना पंजाबच्या होम ग्राऊंडवर रंगणार आहे. गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध पार पडला होता. पंजाबविरुद्धचा सामना हा मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधारल रोहित शर्माने इम्पॅक्ट प्लेअर नियमाबाबत भाष्य केलं आहे.

आयपीएल २०२३ स्पर्धेत पहिल्यांदाच इम्पॅक्ट प्लेअर(dream 11 rohit sharma) नियमाचा अवलंब केला गेला होता. या नियमाचा संघांना चांगलाच फायदा होतोय. कारण सर्व संघांना गरजेनुसार अतिरिक्त फलंदाज किंवा अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याची संधी मिळतेय. अनेक दिग्गज खेळाडूंनी या नियमाचं समर्थनक केलं आहे. तर रोहित शर्मा या नियमाच्या विरोधात आहे.

रोहितने एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हटले की, ‘ मी इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा फॅन नाही. हा नियम अष्टपैलू खेळाडूंची पायखेची करणारा आहे. क्रिकेट हा १२ नव्हे तर ११ खेळाडूंनी खेळाचया खेळ आहे.’

तसेच तो पुढे म्हणाला की,’ या नियमाचा फटका शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर सारख्या अष्टपैलू खेळाडूंना बसेल. या दोघांनाही गोलंदाजी करण्याची संधी मिळत नाहीये. ही आमच्यासाठी चांगली बाब नाही. मला हेच कळत नाहीये की,याने काय साध्य होतंय? १२ खेळाडू तुमचं मनोरंजन करताय. त्यानंतर सामना कुठल्या स्थितीत आहे, खेळपट्टी कशी आहे हे पाहून तुम्ही इम्पॅक्ट प्लेअरला मैदानात उतरवता. जर तुम्ही चांगली फलंदाजी केली तर तुम्ही एका गोलंदाजाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवता. इम्पॅक्ट फ्लेअर म्हणून फलंदाजांना खूपच कमी उतरवलं जातं. कारण सर्व संघातील फलंदाज सध्या चांगली फलंदाजी करत आहेत.’

या पॉडकास्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्टने देखील सहभाग घेतला होता. या पॉडकास्टमध्ये बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला की, ‘ हा नियम केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लागु करण्यात आला आहे. तुम्ही क्रिकेटच्या नियमांसोबत तडजोड करत आहात. हेच कारण आहे की, टी-२० क्रिकेट अधिक मनोरंजक आहे. हा खेळ ११ खेळाडूंसह खेळला जातो. मैदान समान आहे. क्षेत्ररक्षणाची बंधनं देखील समान आहेत. मला तरी वाटतं की हे चिंताजनक आहे.’

हेही वाचा :

उद्या बँका बंद? ‘या’ शहरांनी जाहीर केला Bank Holiday; महाराष्ट्रातील कोणती शहरं?

‘बाई तुम्हाला खुणावेल अन्…’, संजय राऊतांचं नवनीत राणांबद्दल आक्षेपार्ह विधान; ‘आमची बबलीसोबत…’

टीममेटच्या बहिणीच्या प्रेमात रोहित ‘क्लिन बोल्ड’, अशी झाली लव्हस्टोरीची ‘ओपनिंग’