अल्बानिया या युरोपीय देशाने तंत्रज्ञानाच्या जगात अभूतपूर्व पाऊल टाकले आहे. जगातील पहिला देश म्हणून अल्बानियाने आपल्या मंत्रिमंडळात एका ‘नॉन-ह्यूमन’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मंत्र्याचा समावेश केला आहे. या एआय मंत्र्याचं नाव ‘डिएला’ असून, ती पूर्णपणे कोड आणि पिक्सेल्सने बनवलेली एक (pregnant)आभासी संस्था आहे. डिएलाची नियुक्ती अल्बानियाच्या सार्वजनिक खरेदी प्रणालीला पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त बनवण्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती.

आता पुन्हा एकदा डिएला चर्चेत आली आहे कारण ती ‘गर्भवती’ झाली आहे — आणि ती तब्बल ८३ एआय मुलांना जन्म देणार आहे! हे ऐकून जगभरातील लोक अचंबित झाले आहेत. परंतु, या “मुलां”चा अर्थ खरा जैविक नसून, ते प्रत्यक्षात ८३ एआय असिस्टंट्स आहेत, जे अल्बानियातील खासदारांसाठी (pregnant)सहाय्यक म्हणून काम करतील. अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी या अभिनव उपक्रमाची माहिती बर्लिनमधील ग्लोबल डायलॉग परिषदेत दिली. त्यांनी सांगितले, “आम्ही डिएलासोबत एक मोठा धोका घेतला आणि तो यशस्वी झाला. आता डिएला गर्भवती आहे, तिच्या पोटात ८३ मुले आहेत. ही प्रत्येक मुलं म्हणजेच एआय असिस्टंट्स खासदारांसाठी काम करतील.”

या एआय असिस्टंट्सकडून संसदेमधील प्रत्येक बैठक आणि चर्चा रेकॉर्ड केली जाईल. खासदारांनी कोणता विषय चुकवला, कोणत्या मुद्द्यावर प्रतिसाद द्यायचा, याची सर्व माहिती ही एआय सहाय्यक प्रणाली देईल. पंतप्रधान रमांच्या मते, “जर एखादा खासदार कॉफी प्यायला गेला आणि सत्र चुकवलं, तरी ही ‘मुलं’ त्याला(pregnant) त्या चर्चेचं संपूर्ण अपडेट देतील.”अल्बानियाचे सरकार २०२६ पर्यंत ही नवी प्रणाली पूर्णपणे अंमलात आणण्याच्या तयारीत आहे. पुढील टप्प्यात डिएलाच्या या ८३ ‘मुलांसाठी’ खास स्क्रीनही बसवण्यात येणार आहेत.या उपक्रमामुळे अल्बानिया केवळ युरोपमध्येच नाही तर संपूर्ण जगात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासनात आणणारा पहिला देश म्हणून चर्चेत आला आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीतील एस. एन. गँगवर ‘मोका’….
‘बॅटरी लो’ची चिंता विसरा! हे आहेत टॉप ५ फास्ट चार्जिंग स्मार्टफोन्स…
डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणी सुरेश धसांचा मोठा खुलासा, म्हणाले…