इचलकरंजी : शहरातील दहशत माजविणाऱ्या एस.एन. गँगवर (Gang)पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) लागू केला आहे. या कारवाईमुळे इचलकरंजी परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे. या कारवाईत गँगचा म्होरक्या सलमान राजू नदाफ (25, रा. परीट गल्ली, गावभाग) याच्यासह सहा जणांचा समावेश आहे. या कारवाईला विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.मोका अंतर्गत कारवाई झालेल्यांमध्ये अविनाश विजय पडीयार (19, रा. पडीयार वसाहत, यड्राव), अरसलान यासीन सय्यद (19, सध्या रा. सुतारमळा, मूळ रा. जवाहरनगर सरनाईक वसाहत), यश संदीप भिसे (19, रा. रामनगर, शहापूर), रोहित शंकर आसाल (19, रा. शिंदेमळा, खोतवाडी) आणि अनिकेत विजय पोवार (22, रा. दत्तवाड, ता. शिरोळ) यांचा समावेश आहे.

15 जुलै रोजी इचलकरंजीतील गावभाग परिसरात सलमान नदाफ आपल्या साथीदारांसोबत फटाके उडवत होता. त्या वेळी पूनम प्रशांत कुलकर्णी यांनी “फटाके थोडे लांब लावा” अशी सूचना केली. या किरकोळ कारणावरून नदाफ व त्याच्या टोळीने कुलकर्णी यांच्यावर खुनी हल्ला केला. त्यांनी कुलकर्णी यांच्या ब्युटी पार्लरचा दरवाजा, बोर्ड, खिडक्या, तसेच शेजारी असलेल्या दयानंद लाड यांच्या दुकानाचे शटर आणि सागर पाटील यांच्या शौचालयाचे दरवाजे फोडून नुकसान केले.या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात पूनम जाधव-माने यांच्या तपासाखाली(Gang) गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी या पार्श्वभूमीवर अपर अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांना मोका प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी मोका प्रस्ताव सादर केला, ज्याची स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सखोल छाननी करून पुढे पाठवला.

एस.एन. गँगवर आतापर्यंत १८ गुन्हे दाखल असून त्यापैकी १७ गंभीर व दखलपात्र गुन्हे आहेत. यात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, प्राणघातक शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी मारामारी अशा गुन्ह्यांचा(Gang) समावेश आहे. म्होरक्या सलमान नदाफवर एकट्याच्यावर तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत.या कारवाईत पोलीस हवालदार उदय करडे, साजीद कुरणे, सहायक फौजदार सचिन पाटील यांच्यासह पोलिसांच्या विशेष पथकाने सहभाग घेतला.

हेही वाचा :

‘बॅटरी लो’ची चिंता विसरा! हे आहेत टॉप ५ फास्ट चार्जिंग स्मार्टफोन्स…

डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणी सुरेश धसांचा मोठा खुलासा, म्हणाले…

‘माझ्या शर्टमध्ये हात घातला, मला किस केलं’; अभिनेत्रीने सांगितला…. 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *