‘चला हवा येऊ द्या’नंतर सागर कारंडे लवकरच दिसणार ‘या’ हिंदी कार्यक्रमांत

सोनी टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या शोची प्रेक्षकांमध्ये कमालीची(lottery) चर्चा सुरू आहे. या शोमध्ये अनेक मराठीसह हिंदी टेलिव्हिजन कलाकारांचा समावेश आहे. अशातच आता आणखी एका नव्या मराठमोळ्या कलाकाराचा या शोमध्ये समावेश झाला आहे. हा दुसरा तिसरा कोणीही नसून ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडे आहे. सध्या सोशल मीडियावर सागर कारंडेच्या स्किटचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या शोमध्ये गौरव मोरे, कुशल बद्रिके, गौरव मोरे, हेमांगी कवी, अतिशा नाईक हे मराठमोळे सेलिब्रिटी(lottery) आहेत. आता यांच्यासोबत मराठमोळा अभिनेता सागर कारंडे ही स्क्रिन शेअर करणार आहे. हा देखील आता प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार आहे. आपल्या कॉमेडीच्या जोरावर सागर कारंडेने मराठी टिव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. तसाच तो आता हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सोनी टेलिव्हिजनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सागर कारंडेच्या स्किट दरम्यानचा व्हिडीओ शेअर केलेला आहे.

शेअर केलेल्या टीझरमध्ये सागर आपल्या खास मनोरंजनाच्या स्टाईलमध्ये तो मनोरंजन करताना दिसत आहे. सागर कारंडे, गौरव दुबे आणि स्नेहिल मेहरा हे तिघेही एकत्र स्किट सादर करणार आहे. अभिनेत्याचा हा हिंदी टिव्हीवरील पहिलाच प्रोग्राम आहे. सध्या सागरचे चाहते कौतुक करीत आहेत.

कधी स्वारगेट बाई तर कधी पोस्टमनच्या भूमिकेतून सागर कारंडेने मराठमोळ्या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. सागरने त्याच्या आजारपणामुळे ‘चला हवा येऊ द्या’ ला निरोप दिला होता.

अपुरी झोप आणि वेळेवर जेवण नसल्यामुळे सागर आजारी पडला होता. यामुळे सागर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्यानंतर तो बरेच दिवस मराठी नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण आता त्यानंतर थेट सागर हिंदी कार्यक्रमात दिसणार असल्यामुळे चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा :

Google Meet मध्ये आलय ‘हे’ नवीन एआय फिचर

काय सांगता! हमीशिवाय सरकार देतंय ३ लाखांचं कर्ज

राधिका आणि अनंत अंबानींचा विवाह लंडनला होणार नाही?, कुठे होणार?