दीपिका पादुकोणच्या प्रेग्नंसीबाबत चाहत्यांमध्ये प्रश्न; बेबी बंप कुठे?

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने(pregnancy) यावर्षी फेब्रुवारी महिन्यात चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली. दीपिका आणि रणवीर लवकरच आई-बाबा होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली. मात्र आता मे महिना उजाडला तरी दीपिकाचा बेबी बंप दिसत नसल्याने चाहत्यांमध्ये विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दीपिका कुठेही सार्वजनिक ठिकाणी दिसली की सर्वांत आधी तिचा बेबी बंप(pregnancy) पाहण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. प्रेग्नंसीची घोषणा केल्यापासून दीपिका सहसा सैल कपड्यांमध्येच दिसून येत आहे. मात्र तिचा बेबी बंप अजूनही दिसत नसल्याने सरोगसीने आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

नुकतेच रणवीर आणि दीपिका हे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरायला गेले आहेत. हे दोघं बुधवारी संध्याकाळी व्हेकेशनवरून परतले. यावेळी दीपिकाने को-ऑर्ड सेट परिधान केला होता. ती एका गाडीतून उतरते आणि पुढे दोन गाड्यांमधील कमी जागेतून ती बिनधास्त चालत पुढे येते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. जर दीपिका प्रेग्नंट आहे तर ती स्वत:ची काळजी का घेत नाहीये, असा सवाल काहींनी केला. तर काहींनी सरोगसीची शक्यता वर्तवली आहे. दीपिकासुद्धा अभिनेत्री प्रियांका चोप्राप्रमाणेच सरोगसीद्वारे आई होणार असेल, असा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रणवीर आणि दीपिका या दोघांचं नातंसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. कारण या दोघांनी त्यांच्या अकाऊंटवरील लग्नाचे फोटो काढून टाकले आहेत. त्यामुळे त्यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा होऊ लागल्या तेव्हा दोघांकडून असं स्पष्टीकरण देण्यात आलं की त्यांनी 2023 च्या आधीचे सर्व पोस्ट डिलिट केले आहेत आणि त्यात लग्नाच्या फोटोंचाही समावेश होता.

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये दीपिकाने सर्वसामान्य विवाहित जोडप्यांप्रमाणेच आमच्याही संसारात कठीण काळ आल्याची कबुली दिली होती. “जर एखाद्याला असं वाटत असेल की लग्न म्हणजे रोज सकाळी उठून कोणीतरी तुम्हाला तुमचा कॉफी बनवून देतोय किंवा दररोजची पहाट सुंदर होतेय, तर हे साफ खोटं आहे. अर्थात काही दिवस असेही असतात. पण लग्न म्हणजे काम आहे आणि कामच लग्नाला सुंदर बनवतं”, असं मत तिने मांडलं होतं. दीपिका आणि रणवीरने 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो याठिकाणी लग्नगाठ बांधली. मात्र त्यापूर्वी 2015 मध्ये गुपचूप साखरपुडा उरकल्याचा खुलासा रणवीरने ‘कॉफी विथ करण 8’मध्ये केला होता.

हेही वाचा :

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला पुन्हा लिहिलं पत्र; दिलं ‘हे’ वचन

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करा ‘या’ 5 गोष्टी; सुख-समृद्धीत होईल भरभराट

सरकारच्या गोंधळामुळं कांदा बंदरावर सडतोय, निर्यातीला सरकारचा खोडा