कुपवाड येथील रामकृष्णनगर परिसरात कौटुंबिक कारणातून मित्राचा भोसकून खून करण्यात आला. (language)अमोल सुरेश रायते वय ३२ असे मृत तरुणाचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वर्षभरातील कुपवाडमधील हा सातवा खून आहे. घटनेनंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कुपवाड पोलिसांनी याप्रकरणी तपास यंत्रणा राबवून आज तिघांना अटक केली. निहाल असिफ बावा वय २०, सध्या रा. शंभर फुटी सांगली, प्रेम बाळासाहेब मद्रासी २४ व तेजस संजय रजपूत २५ दोघेही रा. रामकृष्णनगर, कुपवाड अशी तिघा अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. मृताचा भाऊ अभिजित सुरेश रायते रामकृष्णनगर, कुपवाड यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अमोल रायते कुपवाड रामकृष्णनगर येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ वास्तव्यास होता. उदरनिर्वाहासाठी सेट्रिंग तसेच फरशी बसविण्याचे तो काम करीत असे. त्याची आई व भाऊ त्याच्यापासून दूर राहत आहेत. अमोलचा चार वर्षांपूर्वीच विवाह झाला होता.(language)कौटुंबिक कारणातून त्याची पत्नी विभक्त राहत होती. काल रात्री अमोलने रामकृष्णनगर येथील घरी मित्रांसह मेजवानी केली. या वेळी संशयित निहाल, प्रेम व तेजस तिघे उपस्थित होते. यावेळी स्वतःच्याच बायकोबद्दल तू अपशब्द का वापरतोस, तिची बदनामी का करतोस, या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. काल रात्री पुन्हा तो वाद उफाळून आला.
दरम्यान, संशयितांनी मध्यरात्रीच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरासमोर अमोलला बोलावून भररस्त्यावर कुऱ्हाड व धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला चढविला. डोके, छातीवर वर्मी घाव बसल्यामुळे अमोल रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. खुनाची घटना समोर आल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाडचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर, महात्मा गांधी ठाण्याचे संदीप शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाच्या सूचना दिल्या.
दरम्यान, संशयितांच्या शोधासाठी कुपवाड पोलिस व गुन्हे शाखेची पथके शोधासाठी रवाना झाली.(language) निहाल यास कुपवाड पोलिसांनी तर प्रेम आणि तेजस यांना एलसीबीने ताब्यात घेतले. तिघा संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संशयित तेजस आणि निहाल हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर तपास करीत आहेत.सामाजिक कार्यकर्ते असिफ बावा यांचा मुलगा हा खुनाच्या गुन्ह्यात संशयित आहे. निहाल असे त्याचे नाव आहे. यापूर्वीही त्याच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
हेही वाचा :