सांगलीत अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

सांगली जिल्ह्यातील करगणी (ता. आटपाडी ) येथील अल्पवयीन मुलीने सोमवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून आत्महत्या(Suicide) केलेल्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचे तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली आहे. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजू विठ्ठल गेंड व रामदास गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.

अन्य दोघेजण फरार आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सायली ही इयत्ता दहावीमध्ये शिकत होती. सोमवार 7 जुलै रोजी सकाळी साडे सहाच्या पूर्वी करगणी ता.आटपाडी येथील राहत्या घरामध्ये रस्सीच्या सहाय्याने लोखंडी अंगलला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केली.

दरम्यान मुलगी साहिलीने रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी जेवत असताना गावातील राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात, व बनपुरी येथील अनिल काळे हे शाळेला जात असताना त्रास देतात व त्यांनी माझा लैंगिक छळ केला आहे त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. याबाबत तिला सकाळी बघू असे सांगितले. ती व तिची बहीण झोपी गेल्या होत्या. सकाळी लवकर लहान मुलीने साहिलीने गळफास घेतल्याचे सांगितले.

मुलगी साहिलीला मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात सर्व रा.करगणी व अनिल नाना काळे (रा.बनपुरी) यांनी मुलीचा लैगिंक छळ करून आत्महत्यास(Suicide) प्रवृत्त केले आहे. या घटनेत बेकरी चालक असणाऱ्या राजू गेंड हा युवक मुख्य सूत्रधार असून बेकरीच्या आडून त्याने अनेक मुली व महिला यांचे लैंगिक शोषण केल्याच्या चर्चा आहे.

बेकरीच्या आत असणारी एक खोली व बेकरी शेजारी असणाऱ्या आयसीआयसी बँकेच्या वरच्या मजल्यावर एक खोली भाड्याने घेतली येथून यांचे रॅकेट सुरू होते. करगणी बस स्थानक हे याच बेकरीच्या समोर असून येथे अनेक महिला शाळकरी मुली थांबलेल्या असतात. समोरच बेकरी असल्याने एसटी बसची वाट पाहत असताना मिळालेल्या दहा-पंधरा मिनिटांच्या अवधीमध्ये बेकरीतून काही साहित्य खरेदी करण्याच्या निमित्ताने गेलेल्या मुली महिला यांच्यासोबत ओळखीचे रूपांतर प्रेमात करून त्यांना आपल्या बाहुपाशात ओढण्याचे काम हे नराधाम करत होते. दरम्यान आरोपी यांच्या मोबाईलमध्ये अनेक महिला व मुलींच्या सोबत केलेल्या अत्याचाराच्या अत्याचाराचे व्हिडिओ मिळाले असून यामध्ये अनेक महिला व मुलींना बळजबरी केल्याचे निष्पन्न झाल्याचे चर्चा सुरू आहे.

दरम्यान करगणीतील बेकरी चालक व त्यामध्ये काम करत असणारे मुलं व त्याचे मित्र यांनी अल्पवयीन मुलीला फुस लावून तिचे व्हिडिओ चित्रीकरण करत तिला तिचे लैंगिक शोषण करून तिला आत्महत्या प्रवृत्त केल्याबद्दल मंगळवारी संपूर्ण करगणी गावांमध्ये सर्व दुकाने व व्यवहार बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत मंगळवारी दिवसभर करगणी गावातील ग्रामस्थांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला होता.

हेही वाचा :