सतेज पाठिंबा अन् महाडिकांना मिळालं दहा हत्तीचं बळ पवारांची मनधरणी आणि मुश्रीफांची मध्यस्थी ठरली निर्णायक

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली आणि मंत्रिपदाच्या जबाबदारीमुळे पाटील यांनी (elephant)महाडिक यांना पाठिंबा दिला.महादेवराव महाडिक आणि पाटील यांच्यातच २००७ ला महापालिकेच्या राजकारणातून ठिणगी पडली. त्याचा पुढे वणवा झाला.

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली. पण, त्यांच्यासमोर खरा अडथळा होता तो आमदार सतेज पाटील यांचा पाठिंबा मिळवण्याचा. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाटील यांची मनधरणी केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली आणि मंत्रिपदाच्या जबाबदारीमुळे पाटील यांनी महाडिक यांना पाठिंबा दिला. पाटील यांच्या पाठिंब्यामुळे दहा हत्तीचं बळ मिळाल्याची प्रतिक्रिया महाडिक यांनी दिली. ही घडामोडच २०१४ च्या निवडणुकीत ‘टर्निंग पॉईंट’ ठरली.

जिल्ह्याच्या राजकारणात कधीकाळी एकत्र असलेले सतेज पाटील-धनंजय (elephant)महाडिक हे कधीही वेगळी वाट धरणार नाहीत, असे चित्र एकेकाळी होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांची चांगली गट्टी होती. तत्पूर्वी महापालिकेच्या राजकारणात पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक एकत्र होते. त्यात धनंजय महाडिक नंतर सहभागी झाले. भविष्यात हे दोघेच काय ते जिल्ह्याच्या राजकारणाची घडी बसवतील, विकास करतील, असे चित्र एकेकाळी दिसत होते. पण, महादेवराव महाडिक आणि पाटील यांच्यातच २००७ ला महापालिकेच्या राजकारणातून ठिणगी पडली. त्याचा पुढे वणवा झाला.

‘..म्हणून त्यांनी राजघराण्यातील राजकीय बळी द्यायलाही मागेपुढे पाहिले नाही’; मुश्रीफांची सतेज पाटलांवर टीका
महाडिक-पाटील या दोघांचे रस्ते वेगळे झाले. पाटील काँग्रेसमध्ये, तर धनंजय महाडिक सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिले. या दोघांचा वाद विकोपाला गेला तो २००९ च्या विधानसभा निवडणुकीत. २००४ च्या लोकसभेत महाडिक यांच्या विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या पाटील यांच्यासमोरच महाडिक यांनी विधानसभेच्या रिंगणात मोठे आव्हान उभे केले. अटीतटीच्या या लढतीत पाटील यांचा विजय झाला खरा पण या दोघांतील मतभेदाची दरी इतकी रूंदावली की जिल्ह्याच्या राजकारणात एवढा टोकाचा विरोध कोणी केला नव्हता इतका हा संघर्ष तीव्र स्वरूपाचा झाला.

‘अजून वेळ गेलेली नाही, सांगलीच्या उमेदवारीचा पुनर्विचार करा’; विश्‍वजित कदमांचे ‘मविआ’च्या नेत्यांना आवाहन
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिल्याने महाडिक गट नाराज झाला. त्याचे पडसाद निकालात उमटले, तशी जाहीर प्रतिक्रिया(elephant)महाडिक यांच्याकडून दिली गेली. २००९ च्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती राजकारणापासून अलिप्तच राहिले. २०१४ च्या लोकसभेचे बिगुल वाजले. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आणि त्यात कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडे गेली. राष्ट्रवादीकडून त्यावेळी धनंजय महाडिक हे एकमेव उमेदवारीचे दावेदार होते. त्यानुसार त्यांना उमेदवारीही मिळाली. पण, खरी अडचण होती ती पाटील यांचा पाठिंबा मिळवण्याची.

त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते आणि त्यात पाटील हे पहिल्यांदाच मंत्री झाले होते. महाडिक यांची उमदेवारी जाहीर झाली तसे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सुरुवातीला आढेवेढे घेणाऱ्या पाटील यांची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढली. शरद पवार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. शेवटी मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने पाटील यांच्या निवासस्थानी या दोन नेत्यांचे मनोमिलन झाले. पाटील यांनी कार्यकर्त्यांना झाले गेले विसरून महाडिक यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

त्यासाठी आपल्या कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा उभी केली. पाटील यांच्या पाठिंब्यानंतर ‘मला दहा हत्तीचं बळ मिळाले’ अशी प्रतिक्रिया महाडिक यांनी दिली. विरोधात त्यावेळी प्रा. संजय मंडलिक शिवसेनेकडून रिंगणात होते. पण, पाटील यांची ताकद आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची असलेली ओळख यामुळे महाडिक यांचा विजय सोपा झाला. महाडिक यांच्या या विजयात पाटील यांचे पाठबळच ‘टर्निंग पॉईंट’ ठरले.

हेही वाचा :

MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीच्या मृत्यूचे रहस्य उलगडले

पाणीटंचाई मुळे महिलांचा सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा

एलपीजी सिलेंडर 400 रुपयात..!