डीप नेक गाऊनमध्ये रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहून नेटकरी म्हणाले, बॉलिवूडची हवा लागली..

सगळ्यांची लाडकी आरची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूची(glamorous clothing) क्रेझ अजूनही कायम आहे. सैराट सिनेमानंतर रिंकूमध्ये बरंच ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळालं. तिचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन असो किंवा लूकमध्ये तिने केलेले बदल असो सोशल मीडियावर तिची चर्चा खूप पाहायला मिळाली आणि आता रिंकूने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नुकतीच रिंकूने फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली आणि तिच्या ग्लॅमरस लूकवर तिचे चाहते फिदा झाले.

राजश्री मराठीने नुकताच रिंकूचा फिल्मफेअर(glamorous clothing) रेड कार्पेटचा लूक शेअर केला. रिंकूने मल्टीकलर डीप नेक गाऊन यावेळी घातला होता. पहिल्यांदाच तिने ग्लॅमरस लूकमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली. या आधी रिंकूने बऱ्याचदा पंजाबी सूट किंवा साडी नेसून रेड कार्पेटवर हजेरी लावलीये. पण रिंकूच्या या ग्लॅमरस लूकने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिचा हा लूक सगळ्यांनाच पसंत पडला.

अनेकांनी तिच्या या लूकवर कमेंट करत तिचं कौतुक केलं. तर काहींनी तिच्या या लूकवर टीका केली. तिला हा लूक छान दिसतोय असं काहींनी म्हंटलं तर काहींनी ‘हिला पण बॉलिवूडची हवा लागली’ असं म्हणत तिच्यावर टीका केली. तर काहींनी तिने असे ड्रेस घालू नयेत तिला भारतीय पोशाखच छान दिसतो असा सल्ला दिला.

दरम्यान रिंकूचा २०२३ मध्ये झिम्मा २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमात तिने साकारलेली तानिया ही भूमिका सगळयांना आवडली. तर तिची आणि निर्मिती सावंत यांची जोडीही सगळ्यांनी एन्जॉय केली. यानंतर रिंकूचे आणखी तीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Rinku Rajguru

रिंकू खिलार या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिनेमात ती अभिनेता ललित प्रभाकरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मकरंद माने या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत तर रिंकू पिंगा या हिंदी सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत ती या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे.

हेही वाचा :

या ७ कारणांमुळे फोन होतो गरम, चुकूनही करु नका या चुका

मूड नसेल तर ऑफिसला येऊ नका, कर्मचाऱ्यांसाठी कंपनीची खास ऑफर

शरद पवारांनी रात्रीत सूत्रे फिरवली! अनिकेत देशमुखांचे बंड थंड; उत्तम जानकरही आज ‘तुतारी’ हाती घेणार