शेअर, रिअल इस्टेट तर नुसता बुडबुडा; सोने-चांदीच येईल कामाला

जगात अनेक जण जगण्यासाठी संघर्ष करतात. गेल्या काही वर्षात महागाईचा विस्फोट(real estate) झाल्यापासून तर मध्यमवर्ग आणि त्याहून श्रीमंतांना पण जगण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामन्य आणि गरिबांचे काय हाल असतील, हे वेगळं सांगायला नको. प्रत्येकाला घर ,कुंटुबकबिल्यासाठी जादा मेहनत घ्यावी लागत आहे.

अनेक जण झटपट श्रीमंत होण्यासाठी जमीन, भूखंड, शेअर बाजार, बाँडमध्ये गुंतवणूक(real estate) करत आहेत. पण ही गुंतवणूक करताना ‘Rich Dad Poor Dad’ या प्रचंड खपाच्या पुस्तकाचे लेखक Robert Kiyosaki यांचा सल्ला अजिबात दुर्लक्षित करु नका, त्यांच्या मते, अजून वाईट काळ यायचा आहे आणि त्यावेळी तुम्हाला परंपरागत गुंतवणूक पद्धतच तारणार आहे.

प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचे आर्थिक सल्ले जगातील अनेक लोक गांभीर्याने घेतात. ते अनाहूत सल्ले देतात. त्यांनी यावेळी त्यांच्या ट्विटर(आताचे X) हँडलवरुन गुंतवणुकीसंबंधीचा असाच एक सल्ला दिला आहे. ‘शेअर बाजार, बाँड, रिअल इस्टेट हा बुडबुडा आहे. ते लवकरच क्रॅश होतील. त्यांची किंमत लवकरच जमिनीवर येईल.’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

अर्थात त्यांनी जगाला अमेरिकन चष्म्यातून हा सल्ला दिला आहे. अमेरिकेवर कर्जाचा डोंगर चढतच आहे. प्रत्येक 90 दिवसांत अमेरिकेवर 1 ट्र्रिलियन कर्ज वाढत आहे. अमेरिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे अमेरिकेतीलच नाही तर जगभरातील गुंतवणूकदारांनी स्वतःला आधी वाचवावे. सोने-चांदी, बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करावी, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिला. शेअर, बाँड, रिअल इस्टेट हा केवळ बुडबुड आहे, तो लवकरच उद्धवस्त होईल. त्यामुळे सोने आणि चांदी, बिटकॉईनच आधार असल्याचा दावा त्यांनी केला.

Bitcoin संबंधी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, कॅथी वूड यांनी म्हटल्याप्रमाणे, बिटकॉईन 2.3 दशलक्षापर्यंत पोहचणार आहे. वूड हा अत्यंत हुशार माणूस आहे आणि त्याच्या सल्ल्यावर माझा भरवसा आहे. वूड जर योग्य सल्ला देत असेल तर मी बिटकॉईनमध्ये अधिक गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. जगातील तेच श्रीमंत सर्वाधिक सुखी आणि आनंदी आहे, जे वारंवार चुका करतात आणि त्यातून काही तरी धडा घेतात, असे कियोसाकी यांना वाटते.

‘रिच डॅड पुअर डॅड’ पुस्तकाने खपाचे अनेक उच्चांक गाठले. हे अत्यंत लोकप्रिय पुस्तक ठरले. जगातील अनेक भाषांत त्याचा अनुवाद झाला. Robert Kiyosaki यांनी 1997 मध्ये हे पुस्तक लिहिले होते. तेव्हापासून ते आजगायत या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या आल्या नि हातोहात विक्री झाल्या. जगातील 50 हून अधिक भाषांमध्ये हे पुस्तक छापण्यात आले आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या 4 कोटींहून अधिक प्रतींची विक्री झाली.

हेही वाचा :

“भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण केव्हाही चांगले,” मोदींच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

मुलींना मासिक पाळी दरम्यान मिळणार सुट्टी, या राज्यातील विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

‘पुष्पा द रूल’मधील ६ मिनिटांच्या सीनसाठी खर्च केले ६० कोटी, शूटिंगसाठी लागला १ महिना