सोन्याच्या भावात घसरण, चांदीही नरमली

सोन्या-चांदीच्या दरात काल उसळी पाहायला मिळाली होती. काल सोन्याच्या(silver spot price) दराने ७३ हजारांचा आकडा पार केला होता. अशातच आज सकाळच्या सत्रात भाव किंचित नरमले आहे.

ऐन लग्नसराईच्या काळात भावात वाढ झाल्याने ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या(silver spot price) दराने उच्चांक पातळी गाठली होती. त्यानंतर दरवाढीचे सत्र सुरुच होते.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दराचा वाढता आलेख पाहायला मिळाला. आज तब्बल १३ दिवसांनी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने ९०० रुपयांनी वधारुन ७२, २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. तर काल सोन्याच्या भाव ७३,४६० रुपये इतका होता. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे नवे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,६६५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,७०० रुपये मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या भावात ७६० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी ८५,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १००० रुपयांनी घसरण झाली आहे.

२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई (Gold Rate in Mumbai) – ७२,५५० रुपये
  • पुणे (Gold Price in Pune) – ७२,५५० रुपये
  • नागपूर (Gold Rate in Nagpur) – ७२,५५० रुपये
  • नाशिक(Gold Price in Nashik) – ७२,५८० रुपये
  • ठाणे (Gold Rate in Thane) – ७२,५५० रुपये
  • अमरावती (Gold Price in Amravati) – ७२,५५० रुपये

हेही वाचा :

अजय-अतुलच्या गाण्यांची जादू, नीता अंबानींचा ‘झिंगाट’वर डान्स

लोकसभेचा धुरळा अन् प्रचाराचा ‘शरद पवार’ पॅटर्न भर पावसात गाजवल्या सभा!

डीपफेक टेक्निकचा धोका वाढला, इंटरनेट विश्वात वावरताना महिलांनी राहावे सावध