आज किंवा उद्या जाहीर होऊ शकते बारावीच्या निकालाची तारीख…

बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या काही दिवसात जाहीर होऊ शकतो. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी (students) पालकांचं लक्ष लागलंय.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. बोर्डाकडून बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आली होती. राज्यात लाखो विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सकुता लागून राहिली आहे. या निकालासंदर्भात सूत्रांच्या आधारे एक माहिती मिळाली आहे. बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबतची घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे

बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

सीबीएसईकडून दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या निकालानंतर महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये (students) उत्सुकता पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे समाज माध्यमांवर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पसरवणारे संदेश व्हायरल केले जात आहेत. अलीकडेच महाराष्ट्र बोर्डाकडून (MSBHSE) समाज माध्यमांवरच्या अफवांवर विश्वास ठेवू नये , असं आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलं होतं.

आता या निकाला संदर्भात महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या निकालाची तारीख आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांनी निकालासाठी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी शैक्षणिक वर्ष 2022-23 चा निकाल 25 मे 2023 रोजी जाहीर झाला होता. त्यानुसार येत्या आठवड्याभरात बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो.

हेही वाचा :

लाज वाटली पाहिजे तुला..; मंदिरात शॉर्ट्स घालून गेल्याने अंकिता लोखंडे ट्रोल

अजित पवारांना घशाचं इन्फेक्शन, राष्ट्रवादीकडून अधिकृत माहिती जारी

“घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी…”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल