‘धनुष्यबाण’ न वापरता निवडणूक लढवून दाखवा, उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीचा(election) प्रचार सुरू करावा, मग मी आहे आणि तुम्ही आहात; पण नाव चोरायचे नाही, वडील चोरायचे नाहीत, पक्ष चोरायचा नाही. धनुष्यबाण बाजूला ठेवा आणि नवी निशाणी घ्या. हिंमत असेल तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह न वापरता निवडणूक लढवून दाखवा. मिंध्यांच्या वडिलांचा फोटो लावा आणि समोर या, असे थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले.

भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत पक्षाला विजय मिळवून देणार्‍या सर्वांचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाचे श्रेय शिवसैनिकांना दिले. पंतप्रधान मोदी, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार त्यांनी आपल्या भाषणात घेतला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, मराठी सर्वांनी मतदान केले. आता काँग्रेससोबत गेलो म्हणून मी हिंदुत्व सोडल्याचा प्रचार भाजपने सुरू केला आहे; पण मी संविधान आणि देश वाचविण्यासाठी मैदानात उतरलो होतो म्हणून देशभक्तांनी मते दिली. त्यात मुस्लिमांचीही मते होती, असे ठाकरे म्हणाले.

हेही वाचा :

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दागिन्यांची मोजदाद सुरू..

छगन भुजबळ ठाकरे गटात येणार? ठाकरे गट मोदींकडे जाणार?

क्रिकेटर गुंतवले तब्बल 1400 कोटी, बनला उद्योजक, भारतात करतोय ‘हा’ बिझनेस