प्लेऑफच्या शर्यतीत असताना श्रेयस अय्यरकडून मोठी चूक, संघाला मोजावी लागणार किंमत

पंजाब किंग्सने प्लेऑफच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. (playoff)चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत थेट गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पंजाब किंग्सचे 13 गुण आणि नेट रनरेट +0.199 इतका आहे. आता उर्वरीत चार पैकी दोन सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफमधील स्थान पक्कं होणार आहे. असं असताना श्रेयस अय्यरला एका चुकीचा फटका बसला आहे.पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात पंजाबने निर्धारित वेळेत गोलंदाजी पूर्ण केली नाही(playoff). त्यामुळे दंड ठोठावण्यात आला. अय्यर आणि त्याच्या संघाने मॅच रेफ्रीसमोर त्यांची चूक मान्य केली आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि वैध असतो.

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरची स्लो ओव्हर रेटशी संबंधित ही पहिली चूक होती. त्यामुळे त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर संघातील इतर खेळाडूंना त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के किंवा 6 लाख रुपये यापैकी जे कमी असेल तो दंड भरावा लागेल.आयपीएल 2025 मध्ये स्लो ओव्हर रेटचा बळी पडलेला श्रेयस अय्यर हा पहिला कर्णधार नाही. (playoff)त्याच्या आधी हार्दिक पंड्या, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रजत पाटीदार आणि शुबमन गिल यांना देखील स्लो ओव्हर रेटसाठी दंड भरावा लागला आहे.

पंजाब किंग्सचे आता चार सामने शिल्लक आहे. त्यापैकी 4 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स, 8 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स, 11 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि 16 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामना आहे. यापैकी पंजाबला दोन सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे.

हेही वाचा :

मोठा घोटाळा ! कोल्हापूर जिल्हा बँकेत 3.21 कोटींचा अपहार

बिबट्याने अंथरुणातून १० महिन्यांच्या बाळाला उचलून नेलं, आईकडून आरडाओरड, पण…

 देशात होणार जातनिहाय जनगणना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारचा मोठा निर्णय